ETV Bharat / sitara

अजय देवगण दिग्दर्शित 'रनवे 34' चित्रपटाचे शुटिंग संपले

author img

By

Published : Dec 20, 2021, 10:57 PM IST

अजय देवगणचं दिग्दर्शन करीत असलेल्या ‘‘रनवे ३४’ या चित्रपटाची प्रतीक्षा खूप काळापासून केली जात आहे. आता या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. अजय देवगण, बोमन इराणी यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीमने चित्रपट पूर्ण जाल्याचा आनंद साजरा केला. यानिमित्ताने एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

अजय देवगण दिग्दर्शित रनवे 34

‘रनवे ३४’ हा चित्रपटात अमिताभ आणि रकुल प्रीत सिंह सोबतच बोमन इराणी, अकांक्षा स‍िंह, अंगीरा धर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

रनवे 34 चित्रपटाचे अगोदरचे शीर्षक होते 'मेडे'

मेडे चित्रपटाचे शीर्षक काही दिवसापूर्वी बदलण्यात आले होते. त्याबाबत दिग्दर्शक अजय देवगणने एक पत्र लिहिले होते. ते पत्र खालील प्रमाणे..

प्रिय मित्रानो,

रनवे ३४ हा सत्य घटनांनी प्रेरित चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पोस्टरसह मी रिलीजची तारीख आणि नवीन शीर्षक अनावरण करत असताना आज मला तुमच्यासोबत आणखी काही तपशील शेअर करण्याची गरज वाटत आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काहीच प्रकट न करता, मला सांगायचे आहे की मी या चित्रपटाकडे का आकर्षित झालो. हा उच्च दर्जाचा भावनिक आणि प्रभावशाली चित्रपट आहे. त्याबद्दल अधिक काही सांगून मला तुमचा भ्रमनिरास करायचा नाहीये.

डोळे बंद करून विचार करा. आपण सर्वांनी जीवनात अशा प्रसंगांना तोंड दिले आहे, जेव्हा एका क्षणी आपल्याला असे वाटते की आपण खूप सामर्थ्यवान आहोत आणि दुसऱ्या क्षणी आपण असहाय्य आहोत. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात अशा क्षणांचा सामना केला आहे, जेव्हा आपल्याला वाटले की आपण जग जिंकू शकू, तर पुढच्याच क्षणी परिस्थितीने आपल्या मार्गात अतुलनीय अडथळे आणलेले असतात. ते वादळ तुमच्या आत आकार घेतंय, तुमच्या भावनांशी खेळतं आणि तुम्हाला तोडतं, प्रचंड चढ-उतारांचा तो खडतर प्रवास, तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागता, हे वाईट स्वप्न आहे की खरंच सगळं घडतंय?

या सर्व भावना ‘रनवे ३४’ शी निगडीत आहेत. प्रचंड आनंदाचे क्षण, अत्यंत धोकादायक परिस्थिती, कमालीचा आनंद आणि निराशा या सर्व भावभावना चित्रपटाच्या पटकथेत सुंदरपणे गुंफल्या आहेत. खरं सांगायचे तर, ही संहिता मला सोडावीशी वाटली नाही. मला आंतरिकरित्या जाणवत होतं की मला हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत बनवायचाच आहे.

महत्वाची आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या चित्रपटाने माझे सहकलाकार अमिताभ बच्चन जी, रकुल प्रीत सिंग, बोमन इराणी, कॅरी मिनाती, आकांक्षा सिंग, अंगिरा धर अश्या सर्वांना आपले अभिनयगुण समोर ठेवण्याच्या समान संधी मिळाल्या आहेत.

यासोबतच अत्यंत कठीण चढ-उतारांच्या प्रवासात माझ्यासोबत एक अप्रतिम टीम आहे. मी लवकरच या चित्रपटाशी संबंधित इतर उत्कृष्ट गोष्टी शेअर करण्यास उत्सुक आहे.

तुमचा

अजय देवगण

‘रनवे ३४’ हा चित्रपट २०२२मधील ईदला म्हणजेच २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिले होते 500 कोटी बजेटच्या चित्रपटाचे वचन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.