मुंबई - प्रसिध्द दिग्दर्शक शूजीत सिरकारचा आगामी चित्रपट आहे 'सरदार उधम सिंग'. यात विकी कौशल मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटींग शुक्रवारी पूर्ण झाले.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'सरदार उधम सिंग'. चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. युरोपमध्ये अखेरचा सीन शूट करण्यात आला.
-
Filming complete... Final schedule of #SardarUdhamSingh was completed in #Europe... Stars #VickyKaushal in title role... Directed by Shoojit Sircar... Produced by Ronnie Lahiri and Sheel Kumar... 2 Oct 2020 release. pic.twitter.com/MiTi6JovYD
— taran adarsh (@taran_adarsh) December 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Filming complete... Final schedule of #SardarUdhamSingh was completed in #Europe... Stars #VickyKaushal in title role... Directed by Shoojit Sircar... Produced by Ronnie Lahiri and Sheel Kumar... 2 Oct 2020 release. pic.twitter.com/MiTi6JovYD
— taran adarsh (@taran_adarsh) December 27, 2019Filming complete... Final schedule of #SardarUdhamSingh was completed in #Europe... Stars #VickyKaushal in title role... Directed by Shoojit Sircar... Produced by Ronnie Lahiri and Sheel Kumar... 2 Oct 2020 release. pic.twitter.com/MiTi6JovYD
— taran adarsh (@taran_adarsh) December 27, 2019
'सरदार उधम सिंग' हा चित्रपट हुतात्मा उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. १९४० मध्ये पंजाबचे माजी गव्हर्नर मायकल ओ डायर यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
१३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियानवाला हत्याकांडामध्ये अंदाधुंद गोळीबार करण्याचा आदेश डायरने दिला होता. त्याचा बदला घेण्यासाठी उधम सिंग यांनी प्रण केला होता.
विकी कौशलने 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली. आता आगामी चित्रपटात विकी एका क्रांतिकारकाची भूमिका साकारत आहे.
शूजीत सिरकार यांचा 'सरदार उधम सिंग' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२० ला प्रदर्शित होणार आहे.