शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सोशल मीडियापासून स्वतःला दूरच ठेवले होते. राज कुंद्राला पॉर्न व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर शिल्पावर जणू आकाशच कोसळले आहे. त्यानंतर शिल्पाने पहिल्यांदाच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पुस्ताकातील उतारा पोस्ट केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये जेम्स थर्बरच्या उदाहरणाचा दाखला दिला आहे. यात लिहिलंय, "रागामध्ये असताना मागे वळून पाहू नका, किंवा घाबरुन पुढेही पाहू नका, तर जागरुक राहून पाहा."
पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "ज्यांनी आपले मन दुखावले आहेत अशा लोकांकडे आपण रागाने वळून पाहतो, जे नैराश्य आपण अनुभवलो आहोत, जे दुर्दैव आपण सहन केले. आपण आपल्या नोकर्या गमावण्याची शक्यता आहे याची आम्हाला भीती वाटते. हरवून जाण्याची, आजारपणाचा त्रास किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू याची भिती वाटत राहते. आम्ही ज्या जागी राहण्याची आवश्यकता आहे, ते हेच आहे, आता जे घडत आहे त्यात काय होऊ शकते, त्याला उत्सुकतेने पाहात नाही आहोत, तर पूर्णपणे जागरुक आहे याची पूर्णपणे जाणीव आहे. "
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, "मी दीर्घ श्वास घेतो, मी जीवंत राहण्यासाठी भाग्यशाली आहे हे जाणत असताना. मी भूतकाळात संकटांचा सामना केला आहे आणि भविष्यातही संकटापासून सुरक्षित राहीन. आज मला माझे जीवन जगण्यापासून विचलित करण्याची काहीही गरज नाही."
अशी गुढ पोस्टच्या माध्यामतून शिल्पा सेट्टीने आपल्या सद्या स्थितीबद्दल शेअर केले आहे. जरी तिने आपल्या पतीच्या बाबतीत तिच्या भूमिकेविषयी काहीही बोलले नसले तरी ती नक्कीच आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार आहे.
दरम्यान, शिल्पा शेट्टी अश्लिल व्हिडिओ बनवण्याच्या कामात पतीची मदत करीत होती का याबद्दलचा तपास सुरू आहे. आतापर्यंत शिल्पाच्या विरोधात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीची होऊ शकते चौकशी, कुंद्रांच्या ऑफिसवर छापा, इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त