मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राने तिच्या इंस्टाग्रामवर एक शॉर्ट व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये तिची मुलगी समिशा 'कन्या पूजन समारंभात' दिसली आहे.
व्हिडिओ क्लिपमध्ये शिल्पा तिचा पती राज कुंद्रासमवेत मुलीला हलवा सर्व्ह करताना दिसली आहे. तिने समिशाच्या पायाची झलकदेखील पोस्ट केली.
हेही वाचा - नवरात्रोत्सवानिमित्त चिमुकल्यांना देवीचे रूप मानून देशभरात उत्साहात कन्यापूजन
'आज अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, आम्हाला आपल्या देवी समिशाच्या आशीर्वादाचे मोठे भाग्य मिळाले, ही समिशाची पहिली नवरात्र आहे, म्हणून 8 लहान मुलींसोबत कन्या पूजा केली आणि सर्व सावधानता राखून त्यांचे स्वागत केले,' असे तिने लिहिले आहे.
'परात्पर देवी महागौरीच्या शुभ दिनानिमित्त तिच्या नऊ दिव्य रूपांबद्दल तिचे आभार मानले गेले. तथापि, यावर्षी आम्ही पूजेदरम्यान सुरक्षेच्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून मास्कचा वापर केला,' असे तिने लिहिले आहे.
हेही वाचा - शिल्पाने मारला जिलेबीवर मस्त ताव... व्हिडीओला चाहत्यांची पसंती