ETV Bharat / sitara

महिनाभर ‘अज्ञातवासात’ गेलेली शिल्पा शेट्टी सार्वजनिक जीवनात परतण्यास झालीय सज्ज? - 'Hungama 2' starring Shilpa Shetty screened

स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कोविड-१९ मदत निधी गोळा करण्यासाठी होणाऱ्या आभासी कार्यक्रमातून शिल्पा शेट्टी सार्वजनिक जीवनात परतणार आहे, अशी बातमी आहे. पती राज कुंद्रा प्रकरणापासून ती सर्व कार्यक्रमापासून लांब आहे. तीन तासांचा हा ‘व्हिडीओथॉन’ रविवारी १५ ऑगस्ट ला संध्याकाळी फेसबुकवर प्रवाहित होणार आहे आणि त्यावेळी कळेल की शिल्पा शेट्टी कुंद्रा ‘अज्ञातवासातून’ बाहेर पडलीय की नाही.

Shilpa Shetty
शिल्पा शेट्टी
author img

By

Published : Aug 10, 2021, 10:40 PM IST

गेल्या महिन्यात, व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा, राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ उत्पादन आणि सामग्री प्रकाशित केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर चित्रपटसृष्टीत आणि शेट्टी-कुंद्रा कुटुंबात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली. महिन्याभरानंतरही या प्रकरणाची परिस्थिती जैसे थे आहे. या आघातानंतर शिल्पा शेट्टी शूटिंगला गेलेली नाहीये. ती सुपर डान्सर चॅप्टर ४ या डान्स रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करीत होती. परंतु तिच्या नवऱ्याला अटक झाल्यानंतर उठलेल्या जनक्षोभानंतर शिल्पाचे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते, शूटिंगला जाणे तर लांबची गोष्ट.

Shilpa Shetty
शिल्पा शेट्टी

त्याच सुमारास शिल्पा शेट्टी अभिनित ‘हंगामा २’ प्रदर्शित होणार होता आणि शिल्पाने प्रेक्षकांना भावनिक आवाहन केले होते की चित्रपट बनताना अनेक लोकांची मेहनत असते म्हणून माझ्यामुळे या चित्रपटाला अव्हेरू नका. तसेच तिने सोशल मीडियावर अशा आशयाची पोस्ट टाकली होती की सेलेब्रिटी म्हणून तिची Never complain, never explain’ ही पॉलिसी आहे. माझ्याबद्दल कृपया वावड्या उठवू नका आणि माझ्या मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल असे काहीही, पुष्टी केल्याशिवाय, छापू नका. परंतु आता ती या स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कोविड-१९ मदत निधी गोळा करण्यासाठी होणाऱ्या आभासी कार्यक्रमातून सार्वजनिक जीवनात परतण्याच्या बातम्या आहेत. या कार्यक्रमात देशी-विदेशी सेलिब्रिटीज सहभागी होणार असून याचे सूत्रसंचालन भारतीय अभिनेता राजकुमार राव करणार आहे.

Shilpa Shetty
शिल्पा शेट्टी

वी फॉर इंडिया: सेव्हिंग लाईव्हस्, प्रोटेक्टिंग लाईव्हलीहुड्स ( We for India : Saving Lives Protecting Livlihoods ) असे या कार्यक्रमाचे नाव असून अर्जुन कपूर, दिया मिर्झा, करण जोहर, टिस्का चोप्रा, परिणीती चोप्रा, सैफ अली खान, सारा अली खान तसेच एड शिरन व स्टिव्हन स्पीलबर्ग सारखे बरेच विदेशी सेलिब्रिटीजसुद्धा याचा भाग असणार आहेत. शिल्पा शेट्टीसुद्धा या कार्यक्रमात भाग घेणार असल्याची कुणकुण लागलीय. हा व्हर्च्युअल इव्हेंट १५ ऑगस्ट रोजी होणार असून या इव्हेंटमधून मिळणारी रक्कम ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, सिलींडर्स, व्हेंटिलेटर, आवश्यक औषधे आणि आयसीयू युनिट्स सारख्या सुविधा पुरवण्यासाठी वापरली जाईल. तसेच लसीकरण केंद्रांच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठीही निधी दिला जाईल. यावेळी जमा होणाऱ्या देणग्यांमुळे दीर्घकालीन सार्वजनिक पुनर्प्राप्ती आणि उदरनिर्वाहाची पुनर्बांधणी करणेदेखील अपेक्षित आहे.

तीन तासांचा हा ‘व्हिडीओथॉन’ रविवारी १५ ऑगस्टला संध्याकाळी फेसबुकवर प्रवाहित होणार आहे आणि त्यावेळी कळेल की शिल्पा शेट्टी कुंद्रा ‘अज्ञातवासातून’ बाहेर पडलीय की नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.