ETV Bharat / sitara

Shehnaz Gill on Siddharth Shukla : 'सिध्दार्थशी नात्यासोबत मी उत्तर द्यायला बांधील...' शहनाझचे सडेतोड उत्तर

शहनाझ गिलने ( Shehnaz Gill on Siddharth Shukla ) गेल्या वर्षी आपल्या मॅनेजरच्या साखरपुड्यानिमित्त आयोजित पार्टीमध्ये डान्स केला होता. तेव्हा तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. सिध्दार्थच्या मृत्यूनंतर ही पार्टी करते, यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.

Shehnaaz Gill
Shehnaaz Gill
author img

By

Published : Mar 27, 2022, 1:12 PM IST

मुंबई : शहनाज गिलने ( Shehnaaz Gill ) अलीकडेच दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत आपल्या नातेसंबंधांविषयी काही गोष्टी शेअर केल्या. यावेळेस तिने ट्रोल करणाऱ्या लोकांचाही चांगलाच समाचार घेतला. शेप ऑफ यू या नंतरच्या शोमध्ये शिल्पा शेट्टीशी बोलताना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये व्यवस्थापकाच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये डान्स केल्याबद्दल ट्रोल करण्यात आले होते.

शहनाझ गिलने गेल्या वर्षी आपल्या मॅनेजरच्या साखरपुड्यानिमित्त आयोजित पार्टीमध्ये डान्स केला होता. तेव्हा तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. सिध्दार्थच्या मृत्यूनंतर ही पार्टी करते, यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. यावर शहनाझ म्हणाली की, "मला हसायला मिळाले तर मी हसेन. मला दिवाळी साजरी करावीशी वाटली तर मी दिवाळी साजरी करेन. कारण आनंदी राहणे आयुष्यात खूप महत्वाचे आहे. मी सुद्धा तसे करण्याचा प्रयत्न करते. "सिद्धार्थसोबतच्या माझ्या नात्याबद्दल मी कुणाला का सांगू? माझं त्याच्याशी काय नातं होतं, याबद्दल मला कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही. तो माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला कोणालाच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही." असेही ती म्हणाली. सिद्धार्थलाही तिने नेहमी आनंदी राहावे असे वाटते. "सिद्धार्थने मला कधीही हसणे थांबवायला सांगितले नाही. सिद्धार्थला नेहमी मला हसताना पाहायचे होते.

सिडनाझ

सिद्धार्थ आणि शहनाज ( Sidharth and Shehnaaz ) हे चाहत्यांमध्ये सिडनाझ म्हणून लोकप्रिय आहेत. बिगबॉसमध्ये त्यांचे सूर जुळले. ते अधिकृतपणे आपल्या नात्याबद्दल बोलले नाही. दोन वर्षापूर्वी सिद्धार्थने रिअॅलिटी शो जिंकला होता. सिध्दार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर 2021 रोजी वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाले.

हेही वाचा - Aamir Khan on Quitting Movie : 'मी चित्रपटसृष्टी सोडण्याचा विचार करत होतो'; आमिर खानचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.