मुंबई - अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत असल्याची बातमी आम्ही तुम्हाला यापूर्वी दिली आहे. येत्या जुलै महिन्यात ती रुपेरी पडद्यासाठी काम सुरू करेल. स्टार किड्सचा गॉडफादर करण जोहर तिला आपल्या धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने लॉन्च करेल.
शनायाने करण जोहरची धर्मा कोर्नेर्स्टोन एजन्सी या टॅलेंट मॅनजमेंट कंपनी जॉईन केली आहे. तिच्यासोबत तृप्ती दिमरी, गुरफाते पीरजादा, धैर्य करवा आणि लक्ष्य लालवानी यांनाही या कंपनीने प्रवेश दिलाय.
हेही वाचा - संजय दत्तने घेतला लसीचा पहिला डोस
मिळालेल्या माहितीनुसार शनाया एका शहरी प्रेमाचा त्रिकोन असलेल्या लव्ह स्टोरीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. शनाया, गुरफाते पीरजादा आणि लक्ष्या लालवाणी यांचा हा प्रेमाचा त्रिकोन असेल. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. २०२१ च्या मध्यावर या चित्रपटाचे सुटिंग सुरू होईल आणि प्रॉडक्शन कसे पूर्ण होते त्यावर प्रदर्शनाची तारीख ठरवण्यात येईल.
शनायाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिने जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटाच सहाय्यकांपैकी एक म्हणून काम केले आहे आणि बहुचर्चित ‘नेटफ्लिक्स’ मालिकेत ‘फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ह्स’ या मालिकेतही काम केले आहे. ती निर्माता बोनी कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची भाची असून अभिनेत्री सोनम कपूर, हर्षवर्धन कपूर आणि जान्हवी कपूर यांची चुलत बहीण आहे.
हेही वाचा - कार्तिक आर्यननंतर आता सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची बाधा