मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या एका सहकाऱ्याचे निधन झाले आहे. शाहरुख आपल्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटला एक मोठा परिवार मानतो. इथे त्याचे अनेक सहकारी काम करत असतात. यातल्याच एकाने जगाचा निरोप घेतला. यामुळे शाहरुखला मोठा धक्का बसला आहे.
याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे. त्याने लिहिलं, ''आम्ही सगळ्यांनी अमर्याद स्वप्ने पाहात सिनेमा बनवायला सुरुवात केली होती. अभिजीत हा आमच्या टीमचा मजबूत आणि महत्त्वाचा भाग होता. आम्ही काही बरे केले, काही चुकाही केल्या. परंतु हा विश्वास कायम होता की, या स्थितीतून आपण सहीसलामत बाहेर पडू कारण आमच्या टीममध्ये अभिजीत होता. तुझी खूप आठवण येईल दोस्ता.''
-
We all started the journey of making films with Dreamz Unlimited. Abhijeet was my most resilient & solid ally. V did some good, some wrong but always believed v will sail through because strong team members like him were there to look after the rest of us. Will miss u my friend. https://t.co/ZpXMr1NWlz
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We all started the journey of making films with Dreamz Unlimited. Abhijeet was my most resilient & solid ally. V did some good, some wrong but always believed v will sail through because strong team members like him were there to look after the rest of us. Will miss u my friend. https://t.co/ZpXMr1NWlz
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 15, 2020We all started the journey of making films with Dreamz Unlimited. Abhijeet was my most resilient & solid ally. V did some good, some wrong but always believed v will sail through because strong team members like him were there to look after the rest of us. Will miss u my friend. https://t.co/ZpXMr1NWlz
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 15, 2020
रेड चिलीज एंटरटेनमेंटनेही आपल्या ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय, ''रेड चिलीज एंटरटेन्मेंटचा एक सदस्य गेल्याने आम्हाला खोलवर धक्का बसला आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. त्याच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत.''
काही दिवसापूर्वी आमिर खानच्या असिस्टंटचाही मृत्यू झाला होता. यामुळे त्याला मोठा धक्का बसला होता. त्याच्या अंत्यविधीला आमिरची पत्नी किरण राव उपस्थित होती.