मुंबई - शाहिद कपूरची बहीण सना कपूरचे आता लग्न झाले आहे. तिचा दीर्घकाळचा प्रियकर मयंक पाहवासोबत तिने महाबळेश्वरमध्ये लग्नगाठ बांधली. मयंक हा मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे. सना ही शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. सनाने आता तिच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तत्पूर्वी सना कपूरला भाऊ शाहिद कपूरकडून एक गोड अभिनंदन पोस्ट मिळाली होती. शाहिद कपूरने बहिण सनासोबतचा एक फोटो इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. यांच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''वेळ कसा उडून गेला आणि आमची लहान बिटो आता वधू बनली आहे. सर्वजण खूप लवकर मोठे झालो आहोत माझ्या लहान बहिणी! एका नवीन अध्यायाची भावनिक सुरुवात. प्रिय सना, तू आणि मयंक चमकत आणि सदैव आनंदी रहा...''
![सना कपूर - मयंक पाहवा विवाह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/m2_0303newsroom_1646298633_816.jpg)
सनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लग्नातील दोन फोटो शेअर केले. वधू सनाने पेस्टल निळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता ज्यात जुळणारा दुपट्टा आणि नारिंगी-लाल ब्लाउज होता. दरम्यान, मयंकने काळा कुर्ता आणि जॅकेट परिधान केले होते. सनाने पोस्टला साध्या हृदयाच्या इमोजीसह कॅप्शन दिले. पहिल्या फोटोत नवविवाहित जोडपे एकमेकांकडे पाहत आहेत तर दुसऱ्या चित्रात मयंक सनाला चुंबन घेण्यासाठी झुकलेला दिसत आहे.
हेही वाचा - Nagraj Manjule on ETV Bharat : अमिताभ बच्चन सरांसोबत काम करणं स्वप्नापेक्षाही मोठं - दिग्दर्शक नागराज मंजूळे