मुंबई - देशात सायबर गुन्हेगारांना बळी पडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार शबाना आझमी यासुद्धा सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणात बळी पडल्या आहेत. या संदर्भात अभिनेत्री शबाना आझमी यांनी सायबर पोलिसांकडे अद्याप तक्रार नोंदवलेली नाही.
अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यासोबत घडलेला प्रकार उघडकीस आणला आहे. काही दिवसांपूर्वी शबाना आझमी यांनी ऑनलाइन दारू मागवण्याचा प्रयत्न केला होता. या वेळेस त्यांनी आगाऊ रक्कमसुद्धा ऑनलाईन भरलेली होती. मात्र ऑनलाइन पैसे भरूनही त्यांना घरपोच लिकर डिलिव्हरी झाली नाही. यानंतर त्यांनी चौकशी केली असता त्यांची सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शबाना आझमीयांनी ट्विटर अकाउंटवर त्यांनी केलेल्या ऑनलाइन पेमेंट बद्दलचा दाखला दिला आहे. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर सदरच्या एका संपर्क क्रमांकावर त्यांनी फोन केला असता त्यांना कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर मुंबई पोलिसांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आव्हान केले होते.
-
Finally traced the owners of @living_liquidz & it turns out that the people who cheated me are fraudsters who have nothing to do with Living Liquidz! I urge @mumbaipolice and @cybercrime to take action to stop these crooks from using names of legitimate businesses & scamming us https://t.co/AUobsRg0on
— Azmi Shabana (@AzmiShabana) June 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Finally traced the owners of @living_liquidz & it turns out that the people who cheated me are fraudsters who have nothing to do with Living Liquidz! I urge @mumbaipolice and @cybercrime to take action to stop these crooks from using names of legitimate businesses & scamming us https://t.co/AUobsRg0on
— Azmi Shabana (@AzmiShabana) June 24, 2021Finally traced the owners of @living_liquidz & it turns out that the people who cheated me are fraudsters who have nothing to do with Living Liquidz! I urge @mumbaipolice and @cybercrime to take action to stop these crooks from using names of legitimate businesses & scamming us https://t.co/AUobsRg0on
— Azmi Shabana (@AzmiShabana) June 24, 2021
दरम्यान काही वेळापूर्वी शबाना आझमी यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन सांगितले आहे की, अखेर @Living_liquidz च्या मालकांना शोधून काढले आणि हे सिद्ध झाले की ज्या लोकांनी मला फसवले ते फसवणारे लोक आहेत, ज्यांचा लिव्हिंग लिक्विड्सशी काही संबंध नाही! मी मुंबई पोलीस आणि सायबर क्राईम यांनी आग्रह करते की या बादमाशांवर कारवाई करण्यात यावी व कायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या नावाचा गैरवापर थांबवून आमच्यासारख्यांची फसवणूक रोखावी.
हेही वाचा - ४५ वर्षाने बच्चनने सांगितले 'दीवार'चे रहस्य, म्हणाले, "ही टेलरची चुक होती"