मुंबई - प्रकाश कोवेलामुडी यांचं दिग्दर्शन असलेला 'जजमेंटल हैं क्या' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. कंगना रनौत आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी ५.४० कोटींची कमाई केली होती. तर आता दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.
दुसऱ्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ८.०२ कोटींचा गल्ला जमावला आहे. दोन दिवसात चित्रपटाने १३.४२ कोटींची कमाई केली आहे. 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझ यांच्या अर्जुन पटियालासोबत क्लॅश पाहायला मिळाला.
अर्जुन पटियालाने पहिल्या दिवशी १.२५ कोटींचा गल्ला जमावला. जजमेंटल हैं क्या चित्रपटात कंगनाने मनोरूग्णाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील मर्डर मिस्ट्रीचा थरार आणि वेगवेगळे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. आता हा सिनेमा आणखी किती गल्ला जमावणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.