मुंबई - बॉलिवूड स्टार संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची ही भेट दुबई मध्ये घडल्याचे वर्तविले जात आहे. परवेझ मुशर्रफ हे प्रकृती अस्वास्थामुळे व्हील चेयर बसलेले दिसत असून संजय दत्त कुणाकडे तरी अंगुलीनिर्देश करताना दिसतोय. मुशर्रफ हे आखाती देशातील दुबई येथे वास्तव्यास असतात आणि संजय दत्तचे सुद्धा दुबईमध्ये घर आहे. दुबईला गेलेली त्याची पत्नी आणि मुले पहिल्या लॉकडाऊनमध्ये तिथेच अडकली होती आणि संजय दत्त एकटाच मुंबईत होता.
दत्त आणि मुशर्रफ या दोघांचे वास्तव्य दुबईत असल्याकारणाने त्यांची भेट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या भेटीमुळे पुन्हा एकदा संजय दत्तवर टीका केली जात आहे.
अलीकडेच, संजय दत्त ने दिल्ली आणि जयपूरमध्ये 'घुडचडी' चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण केलं. केएजीएफ चॅप्टर २ मध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारत असून शमशेरा, पृथ्वीराज या चित्रपटांमध्ये देखील तो दिसणार आहे.
हेही वाचा - Happy Holi 2022 : अमिताभ, अक्षय, कपिल शर्माने दिल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा