ETV Bharat / sitara

‘फादर्स डे’ च्या निमित्ताने जमला कुटुंबवत्सल सलमानचा 'दबंग' गोतावळा !!

सलमान सुद्धा त्याचे फॅन्स, मित्र आणि कुटुंबीय यांच्याबाबतीत निष्ठा बाळगून असतो आणि त्यांच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात हळवा पण आहे. त्याचे आयुष्य फुलपाखरासारखे आहे असे मीडियातून रंगविले जाते. ते काहीही असलं तरी सलमान खान ही अत्यंत कुटुंबवत्सल व्यक्ती आहे.

Salman Khan
कुटुंबवत्सल सलमान खान
author img

By

Published : Jun 24, 2021, 5:42 PM IST

प्रेक्षकांचा आणि बॉलिवूडचा ‘भाई’ म्हणजे सलमान खान. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये टॉप ला राहणाऱ्या मोजक्या हिरोंपैकी एक. सलमान खानचा निष्ठावंत फॅन वर्ग आहे जो अजूनही त्याला प्रचंड पाठिंबा देतो, इतका की सोशल मीडियावर त्याच्या बाजूने भांडताना पण दिसतो. सलमान सुद्धा त्याचे फॅन्स, मित्र आणि कुटुंबीय यांच्याबाबतीत निष्ठा बाळगून असतो आणि त्यांच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात हळवा पण आहे. त्याचे आयुष्य फुलपाखरासारखे आहे असे मीडियातून रंगविले जाते. ते काहीही असलं तरी सलमान खान ही अत्यंत कुटुंबवत्सल व्यक्ती आहे.

सलमानने आपले भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांना स्वतः काम करीत असलेल्या चित्रपटांचा निर्माता बनविले आणि त्यांच्या आयुष्याची आर्थिक गाडी रुळावर आणली. त्याआधी अरबाज आणि सोहेल यांनी अभिनय, दिग्दर्शन यात आपले नशीब आजमावून पहिले होते आणि दुर्दैवाने त्यात त्यांना अपयश आले होते. सलमान ची बहीण अल्विरा, जी त्याच्या जेलमध्ये असण्याच्या काळात सतत त्याला धीर देत होती, आणि तिचा नवरा अतुल अग्निहोत्री, यांनाही निर्माते बनवून त्याने त्यांचा इंडस्ट्रीत जम बसविला. अतुल अग्निहोत्री याने अनेक चित्रपटांतून अभिनय केला असून तो आता यशस्वी निर्माता म्हणून ओळखला जातो, सलमान खान मुळे.

Salman Khan
कुटुंबवत्सल सलमान खान
अर्पिता खान, ही सलमानची सर्वात लहान बहीण. खरंतर ती त्याची सर्वात लाडकी आणि त्याने तिचे अभिनेता आयुष शर्मा सोबत शुभ मंगल लावून दिले. त्याआधी अर्पिता आणि अर्जुन कपूर यांचे प्रेमप्रकरण सुरु होते पण ती टिकले नाही. परंतु अर्जुन आणि सलमानची एक्स-वाहिनी मलाइका अरोरा सध्या डेटिंग करीत आहेत. खरंतर सलमान खानने अर्जुन कपूरच्या करियरला दिशा देण्याचे काम केले होते. परंतु जेव्हा त्याला या प्रकरणाची भनक लागली तेव्हा त्याने त्याच्याशी बोलणेच टाकले. मलाइका अरबाज खानची बायको होती आणि आता ते विभक्त झालेले आहेत. असो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सलमानकडून काही काम करवून घ्यायचे असेल तर ते अर्पिताला कॉन्टॅक्ट करतात कारण सलमान अर्पिताच्या शब्दाबाहेर नाही असे म्हटले जाते. तिचे यजमान आयुष्य शर्मा सध्या ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ मध्ये प्रमुख भूमिका साकारत असून त्यात सलमान खान एका शीख पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट मराठी सुपरहिट ‘मुळशी पॅटर्न’ वर आधारित असून याचे दिग्दर्शन करताहेत महेश मांजरेकर. महेश मांजरेकर आणि सलमान खान ची घट्ट दोस्ती असून सलमान ने ‘दबंग ३’ मध्ये मांजरेकरांच्या मुलीला, सई मांजरेकर ला, आपली नायिका म्हणून बॉलिवूड ब्रेक दिला होता. सलमानचे वडील सलीम खान म्हणजे अत्यंत प्रसिद्ध लेखकद्वयी ‘सलीम-जावेद’ मधील एक. सलमान खान वयाच्या पन्नाशीत आहे आणि तो अजूनही वडिलांच्या धाकात आहे आणि हे सांगायला त्याला मुळीच लाज वाटत नाही. सलमानचे आयुष्य अनेक नकोश्या घडामोडींतून गेले असून त्याच्या वडिलांनी त्याला नेहमीच नेटका मार्ग दाखविला. नुकताच ‘फादर्स डे’ साजरा झाला आणि सलमान ने आपले संपूर्ण कुटुंबीय एकत्र आणत सलीम खान सोबत तो साजरा केला. पूर्वी हे सर्व भाऊ आपापल्या बायका-मुलांसकट ‘गॅलक्सि’ मध्ये आई-वडिलांसोबत राहत, परंतु आता सगळे वेगळे राहतात. मात्र सलमानच्या एका हाकेवर धावतपळत येतात. ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने सलमान खानने आपले वडील व भावांसोबत आणि वडील, त्यांची मुले आणि नातवंडांसोबतचे फोटो सामायिक केले व त्यातून सलमान खान चा कुटुंबवत्सलपणा ओतप्रोत ओसंडताना दिसतोय. तसेच सलमान खान आपले भाची-भाचे, पुतणे-पुतण्या यांच्यावर खूप प्रेम करतो हे सर्वश्रुत आहे आणि जर का त्याची स्वतःची मुलं असती तर किती प्रेम केले असते? अर्थात त्यासाठी सलमानचे लग्न व्हायला हवे आणि ते कधी होईल ते ईश्वराला आणि सलमानलाच ठाऊक.

हेही वाचा - सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वात १४ लिटिल चॅम्प्सना साथ देणार ४ छोटे वादक!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.