मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी तो आपल्या चित्रपटामुळे, कधी ऑनस्टेज कोणासोबत तरी मस्तीमुळे किंवा अचानक कोणावर भडकण्यानं मीडियामध्ये हेडलाईन बनतो.
अशात आता गणेशोत्सवादरम्यान केलेल्या एका कृत्यामुळे सलमान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. गणपती विसर्जनावेळी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरलेला सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असताना आता विसर्जनादरम्यान सिगरेट ओढतानाचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
आपल्या बिंग ह्यूमन संस्थेमार्फत कॅन्सरविरुद्ध अभिनयान चालणाऱ्या या अभिनेत्यावर टीकेची झोड उठली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राही सिगरेट पिल्याने ट्रोल झाली होती. आस्थमाचा त्रास असल्याचे सांगत प्रदूषण न करण्याचे आवाहन जाहिरातीतून करणाऱ्या प्रियांकालाही नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं.