मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खान सध्या चित्रीकरणातील व्यापातून आपल्या परिवारासोबत वेळ घालवतोय. तो नेहमीच कुटुंबीयांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. सध्या त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ खूप चर्चेत आहे.
सलमानने वडिल सलीम खानसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात पार्श्वगायक कमाल खानदेखील दिसत आहे. सलीम खान मोहम्मद रफी यांचे 'सुहानी रात ढल चूकी, ना जाने तुम कब आओगे', हे गीत गाताना दिसत आहेत. सलमानचा हा व्हिडिओ आतापर्यंत २४ लाखाहून अधिक जणांनी पाहिलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सलमान खानचा भारत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करीत आहे. यात सलमानसोबत कॅटरीना कैफ, दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, तब्बू, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सलमान सध्या 'दबंग ३' आणि 'इन्शाल्लाह' या दोन चित्रपटात काम करीत आहे.