ETV Bharat / sitara

सलमान खानने उघडले ‘सिंगल स्क्रीन’ थिएटरचे शटर! - सलमानने उघडला थिएटरचा दरवाजा

सलमान खानचा प्रमुख चाहतावर्ग आहे ‘सिंगल स्किन’ वाला. तिथे सलमान खानच्या प्रत्येक नवीन सिनेमाच्या एंट्रीला शिट्ट्या आणि टाळ्या यांनी चित्रपटगृह दुमदुमून जात असते आणि पुढील पाचेक मिनिटे एकही संवाद ऐकायला येत नाही. त्यामुळेच सलमान खान ने पुढाकार घेऊन ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ चा ट्रेलर मल्टिप्लेक्समध्ये लॉन्च केल्यानंतर, आयुष शर्मा सोबत एका लोकप्रिय सिंगल स्क्रीनचे शटर उघडले.

सलमान खानने उघडले ‘सिंगल स्क्रीन’ थिएटरचे शटर

author img

By

Published : Oct 26, 2021, 6:26 PM IST

कोरोना प्रादुर्भावामुळे मनोरंजनसृष्टीचे आर्थिक गणित खिळखिळे झाले होते. सिनेमाघरं तर आताआतापर्यंत बंद होती. परंतु आता ही महामारी आटोक्यात आल्यासारखी दिसतेय आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहांची टाळी उघडली जात आहेत. त्यामुळे अनेक निर्माते-दिग्दर्शक आणि स्टार्ससुद्धा आपापले चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यासाठी धडपडत आहेत. मोठ्या निर्मितीसंस्थांनी लगेचच प्रदर्शनाच्या तारखा घोषित केल्यापासून त्यांचा तिकीटबारीवर धंदा कसा होतो याचे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष असणार आहे. येत्या दिवाळीत दीडेक वर्षे प्रदर्शसाठी रखडलेला रोहित शेट्टी दिग्दर्शित व अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि कॅटरीना कैफ अभिनित ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार असून अख्खी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांनी सिनेमागृहांत पूर्वीप्रमाणे गर्दी करावी अशी अपेक्षा बाळगून आहे.

सलमान खानने उघडले ‘सिंगल स्क्रीन’ थिएटरचे शटर

तसेच अनेक मोठमोठाले चित्रपट एकामागोमाग एक रिलीज होत असून प्रेक्षकांसाठी ती पर्वणी ठरेल असा अंदाज वर्तविला जातोय. यात ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स चा चित्रपटदेखील मोडतो. नुकतेच याचे ट्रेलर प्रदर्शित झाले आणि नेटिझन्सनी त्याला भरपूर प्रेम दिलंय. या चित्रपटात सलमान खान तर आहेच परंतु त्याचा मेव्हणा आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटावर आधारित आहे. “सर्वचजण थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहे. आता चित्रपटगृहे सुरु होत आहेत आणि काही चित्रपट मोठ्या पडद्यावरच जास्त मजा देतात. आणि ‘अंतिम’ हा त्याच पठडीतला चित्रपट आहे. महेश मांजरेकरने तो उत्तमरीत्या बनविला असून प्रेक्षकांना जो जरूर आवडेल. आयुष ने यातील भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली आहे आणि आम्ही सर्व ‘फायनल प्रॉडक्ट’ बद्दल समाधानी आहोत. आता प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला हवेत, अर्थात कोविडचे नियम पाळून.”

सलमान खानचा प्रमुख चाहतावर्ग आहे ‘सिंगल स्किन’ वाला. तिथे सलमान खानच्या प्रत्येक नवीन सिनेमाच्या एंट्रीला शिट्ट्या आणि टाळ्या यांनी चित्रपटगृह दुमदुमून जात असते आणि पुढील पाचेक मिनिटे एकही संवाद ऐकायला येत नाही. त्यामुळेच सलमान खान ने पुढाकार घेऊन ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ चा ट्रेलर मल्टिप्लेक्समध्ये लॉन्च केल्यानंतर, आयुष शर्मा सोबत एका लोकप्रिय सिंगल स्क्रीनचे शटर उघडले. खरंतर गेल्या वर्षी सलमान खान त्याचा ‘राधे’ जास्तीत जास्त एकल पडदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणार होता जेणेकरून त्या चित्रपटगृह मालकांना लॉकडाऊनच्या काळात झालेलं नुकसान भरून काढता येईल. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा चित्रपटगृह बंद ठेवावी लागली आणि ‘राधे’ ला ओटीटी चा रास्ता पकडावा लागला. परंतु आता सलमान ने थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचे महत्त्व दर्शविण्यासाठी शहरातील लोकप्रिय सिंगल स्क्रीनचे शटर उघडले. आपल्या आवडत्या सुपरस्टार ला देशातील सिंगल स्क्रीनला प्रोत्साहन देताना पाहून अनेक चाहते आणि प्रेक्षक भावूक झाले.

हेही वाचा - राज कुंद्राच्या नोटिशीला काय आहे शर्लिनचे उत्तर?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.