ETV Bharat / sitara

Salman Khan Lawyer Death : ज्येष्ठ वकील श्रीकांत शिवदे यांचे निधन, सलमान खानसह बॉलिवूडच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणात मांडली होती कलाकारांची बाजू - सुलेमान बेकरी गोळीबार प्रकरण

बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे वकील श्रीकांत शिवडे (Salman Khan Lawyer Shreekan sgivase death) यांच वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत शायनी आहुजा लैंगिक अत्याचार प्रकरण, सुलेमान बेकरी गोळीबार प्रकरण मुंबईचे माजी पोलीस प्रमुख आरडी त्यागी, सलमान खानचं हिट अँड रन (Salman Khan Hit and Run Case) ही हायप्रोफाईल प्रकरण हाताळली होती.

shreekant shivade
shreekant shivade
author img

By

Published : Jan 20, 2022, 4:16 PM IST

मुंबई - अभिनेता सलमान खानचं हिट अँड रन (Salman Khan Hit and Run Case) हे सर्वात सर्वाधिक वादग्रस्त आणि हाय-प्रोफाइल प्रकरण मानलं जातं. जेव्हा या प्रकरणात सर्व बाजूंनी अपयश येत होतं. त्यावेळी वकील श्रीकांत शिवडे यांनी ही केस सांभाळली होती. सलमानचे वकील श्रीकांत शिवडे (Salman Khan Lawyer Shreekan sgivase death) यांच वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं आहे.

प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आई, पत्नी आणि मुलगा असं श्रीकांत यांचं कुटुंब आहे. श्रीकांत शिवडे यांचे बोन मॅरो ट्रांसप्लांट झाले होते. त्यांनी इंडियन लॉ सोसायटी येथून शिक्षण घेतले होते. सत्र न्यायालयासह उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी अनेक खटल्यात कामाचा ठसा उमटविला होता. सैफ अली खान, तब्बू , सोनाली बेंद्रे आणि निलम यांची शिकार प्रकरणाची केस देखील श्रीकांत यांनी हँडल केली होती.

लढल्या अनेक हायप्रोफाईल केसेस
श्रीकांत शिवडे यांनी अनेक हाय प्रोफाअल केसेस लढल्या आहेत. श्रीकांत यांनी शाइनी आहूजा, 2 जी स्पेकट्रम ही केस देखील लढली होती. 20 वर्षा पूर्वी सलमानवर हिट अँड रनचा आरोप लावण्यात आला होता. सलमानची ही केस खूप काळ चालली, या केसमुळे सलमानला कोर्टाने नंतर क्लिन चिट देखील दिली होती. शाइनी आहूजा यांची केस श्रीकांत यांनी 2009 साली हँडल केली. तसेच डायमंड बिजनेसमॅन भरत शाह यांची केस देखील श्रीकांत यांनीच लढली होती. तसेच आहुजा लैंगिक अत्याचार प्रकरण, सुलेमान बेकरी गोळीबार प्रकरण मुंबईचे माजी पोलीस प्रमुख आरडी त्यागी, बसून एक प्रकरणातील दीपक कुलकर्णी, मुंबईतील सर्वात हायप्रोफाईल हत्याकांड असलेले शिना बोरा प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी आदींचा सुद्धा समावेश आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते.

काय आहे हिट अ‍ॅंड रन प्रकरण
बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने 28 सप्टेंबर 2002 रोजी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून मुंबईतील अमेरिकन बेकरीनजीकच्या पदपथावर झोपलेल्या चारजणांना आपल्या गाडीने चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. याशिवाय तिघांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले. या प्रकरणी 13 वर्षांपासून सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता.
हेही वाचा - Seven ZP teachers corona positive : लाडगाव जिल्हा परिषद शाळेतील 7 शिक्षक पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.