ETV Bharat / sitara

सलमान खानला 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार,  जॉन ट्रॅव्होल्टासोबतचा व्हिडिओ व्हायरल - सलमान जॉन ट्रॅव्होल्टा व्हायरल व्हिडिओ

रियाध, सौदी अरेबिया येथे आयोजित जॉय अवॉर्ड्स 2022 मध्ये सलमान खानला 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला. या समारंभात सलमानने अभिनेता जॉन ट्रॅव्होल्टाचीही भेट घेतली. पल्प फिक्शन स्टार जॉन ट्रॅव्होल्ट यांना सलमानने स्वतःची ओळख करुन गिली आणि त्यांच्या सिनेमातील अभिनयाचे कौतुकही केले.

सलमान खानला पर्सन ऑफ द इयर पुरस्कार
सलमान खानला पर्सन ऑफ द इयर पुरस्कार
author img

By

Published : Jan 31, 2022, 1:47 PM IST

मुंबई - सौदी अरेबियातील रियाध येथे आयोजित जॉय अवॉर्ड्स 2022 मध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला सन्मानित करण्यात आले आहे. सलमानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर समारंभातील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड घेताना दिसत आहे.

सलमान खान पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणाच्या व्हिडिओने देखील इंटरनेटवर धमाल उडवून दिली आहे. एक अभिनेता म्हणून त्याच्या जीवन प्रवासाची झलक यावेळी मोन्टाजच्या स्वरुपात दाखवण्यात आली.

सौदी अरेबियाच्या जनरल एंटरटेनमेंट अथॉरिटीद्वारे आयोजित जॉय अवॉर्ड्स 2022 विविध शैली आणि श्रेणींमधील ख्यातनाम व्यक्तींना पुरस्कार देऊन कलात्मक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. या समारंभात सलमानने अभिनेता जॉन ट्रॅव्होल्टाचीही भेट घेतली. पल्प फिक्शन स्टार जॉन ट्रॅव्होल्ट यांना सलमानने स्वतःची ओळख करुन गिली आणि त्यांच्या सिनेमातील अभिनयाचे कौतुकही केले.

सलमान आणि जॉनच्या भेटीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात सलमानने जॉनच्या चित्रपटांमधील अभिनयाचे कौतुक करताना दिसत असून त्याने स्वतःची ओळखही करून दिली. "मी भारतीय चित्रपटसृष्टीत काम करतो. माझे नाव सलमान खान आहे" असे म्हणताना सलमान ऐकू येतो. सलमान आणि जॉनच्या व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा - बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाशचे घरी ग्रँड वेलकम, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.