ETV Bharat / sitara

‘जेव्हा सैराटला भेटते धडक’ - Dhadak girl Janhavi Kapoor latest news

सैराट फेम रिंकु राजगुरूचा एक फोटो सध्या खूप जोरात व्हायरल झालाय. यात ती हिंदीतील अग्रणी अभिनेत्रीसोबत दिसत आहे. या दोघींच्या एकत्रीत फोटोने चर्चेला उधाण आले आहे.

जेव्हा सैराट धडकला भेटते
author img

By

Published : Oct 14, 2019, 11:57 PM IST

'सैराट' चित्रपटात रिंकुने 'आर्ची' ही व्यक्तीरेखा साकारली होती. हा चित्रपट मराठी सिनेमाचा इतिहास घडवणारा होता. यातून रिंकू आणि आकाश ठोसर यांची जोडी प्रचंड गाजली. यानंतर चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक झाला, त्याचे शीर्षक होते 'धडक'.

'धडक' चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिची जोडी इशान खट्टरसोबत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करु शकला नसला तरी जान्हवी आणि इशानच्या जोडीची भरपूर चर्चा झाली.

रिंकुने शेअर केलेल्या फोटोत हीच जान्हवी कपूर दिसत आहे. तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘जेव्हा सैराट धडकला भेटते’.

जान्हवी सध्या ‘द कारगिल गर्ल’ चित्रपटात भूमिका करीत असून अलिकडेच रिंकुचा ‘कागर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दोघीही आपआपल्या क्षेत्रात पाय भक्कम करुन उभ्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.