मुंबई - सैफ अली खानचा मुलगी सारा अली खाननंतर आता मुलगा इब्राहिमही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ही गोष्ट दुसऱ्या कुणी नाही तर स्वतः सैफ अलीने सांगितली आहे. एका वृत्तानुसार, सैफ म्हणाला, "इब्राहिम अभिनय कारकिर्दीसाठी तयार दिसत आहे आणि का नाही? मला माझ्या सर्व मुलांना या व्यवसायात पाहायला आवडेल. येथे काम करणे चांगले."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मुलाखतीत तो म्हणाला, "मला आठवतंय, की मी १७-१८ वर्षांच्या वयात गोंधळात पडलो होतो. अभिनयामुळे मी संपवण्यापासून वाचलो होतो. काम हाती असण्याने ओळख निर्माण झाल्याने मला कामाचे समाधान मिळाले आणि मला ते सर्व मिळाले जे मला हवे होते.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सैफ अली खानने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते, की अभिनयात येण्यापूर्वी इब्राहिमने विद्यापीठाचा अभ्यास पूर्ण करावा अशी त्यांची इच्छा आहे. सारा अली खाननेही बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या आधी विद्यापीठ पूर्ण केले होते. अलीकडील काळात इब्राहिम अली खान बहीण सारा अली खानसमवेत एका मॅगझिनच्या कव्हरवर आणि कपड्यांच्या ब्रँडच्या फोटोशूटमध्ये दिसला होता. हे फोटोशूट चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले होते.
अब्राहम अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याची फॅन फॉलोईंगही भरपूर आहे.