मुंबई - अभिनेता सैफ अली खानने आपल्या मानवतावादी रावणाच्या विधानाबद्दल ट्रोल झाल्यावर माफी मागितली आहे. तो म्हणाला की भगवान राम हे त्याच्यासाठी नेहमीच चांगुलपणाचे आणि पराक्रमाचे प्रतीक राहिले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला होता की त्याचा आगामी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रावणाची 'मानवी' बाजू दाखवणारा आहे.
या ट्विटला भाजप नेते राम कदम यांच्यासह अनेकांना आक्षेप घेतला. भाजप नेत्याने रविवारी लिहिले की, "अभिनेता सैफ अली खानने आपल्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाविषयी अतिशय धक्कादायक विधान केले आहे. रावणाची भूमिका करणारा सैफ रावणाने सीतामाईचे अपहरण केल्याबद्दलचे समर्थन करेल. रावणाच्या मानवी बाजूचे दर्शन घडवेल आणि श्रीरामाच्या विरुध्द रावणाने केलेल्या युध्द योग्य असल्याचे म्हणेल.''
हेही वाचा - ख्रिस्तोफर नोलन यांनी स्वतःच्या हस्ताक्षरातील डिंपल यांना लिहिलेली चिठ्ठी अक्षयने केली शेअर
त्यांनी पुढे लिहिले, "दिग्दर्शक ओम राऊत यांनी 'तान्हाजी' बनवला, ज्याचे जगभर कौतुक झालं. हा चित्रपट हिंदू अभिमान आणि मराठी अस्मितेला न्याय देणारा होता. परंतु आदिपुरूष चित्रपटाने रावणाला सकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सीतामाईच्या अमानवी अपहरणाला योग्य ठरवले तर आम्ही तसे होऊ देणार नाही.''
याबद्दल सैफ अली खानने दिलगीरी व्यक्त करीत म्हटलंय की, "माझ्या मुलाखतीतील विधानाने लोकांच्या भावना दुखावल्याचे कळले आहे. माझा असे करण्याचा हेतु नव्हता किंवा मी जाणीवपूर्वक असे केलेले नाही."
हेही वाचा - अभिनेता शेखर सुमन साजरा करणार नाहीत वाढदिवस, कारण...
दिलगीर आहोत आणि स्पष्टीकरण देताना सैफ रविवारी म्हणाले, "मला एका मुलाखतीदरम्यान माझ्या विधानातील वाद आणि लोकांच्या भावना दुखावल्या आहेत हे कळले आहे. माझा असा हेतू नव्हता किंवा मी मुद्दाम काही बोललो नाही. मी प्रामाणिकपणे सर्वांची माफी मागत आहे आणि विधान मागे घेत आहे. भगवान राम माझ्यासाठी नेहमीच धार्मिकतेचे आणि शौर्याचे प्रतिक राहिले आहेत. 'आदिपुरुष' चित्रपट वाईटावर चांगुलपणाच्या विजयाबद्दल आहे आणि संपूर्ण टीम महाकाव्यावर कोणतीही विकृती न आणता सादर करण्यावर एकत्र काम करीत आहे.''