ETV Bharat / sitara

साहिल म्हणतो, ''नाव मोठे आणि लक्षण खोटे... ओळखा पाहू कोण?'' - Sahil Khan in Style

सुशांतसिंहच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीचा मुद्दा गाजत आहे. स्टार पॉवरबाबतीत अनेक वाद सुरू आहेत. याबाबतीतला आपला अनुभव सांगताना अभिनेता साहिल खानने सलमान आणि शाहरुखसोबतचा मॅगझिनच्या कव्हरवरील फोटो शेअर केलाय. त्याने आपल्याला कसे सिनेमातून काढून टाकण्यात आले याचा खुलासाही आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

Sahil Khan
सुपरस्टार पॉवर प्ले
author img

By

Published : Jun 19, 2020, 1:04 PM IST

मुंबई - अभिनेता साहिल खान याने एन. चंद्रा यांच्या २००१ मध्ये आलेल्या 'स्टाईल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर साहिल खानने काही चकित करणारे खुलासे केले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर प्रसिध्द मॅगझिन स्टारडस्टचे कव्हर पेज शेअर केले आहे. यावर साहिल खानसह सलमान आणि शाहरुख खान दिसत आहेत.

साहिलने स्वतःच्या करियरच्या बाबतीत काय घडले याचा खुलासा करताना लिहिलंय, ''फार कमी लोकांच्या आयुष्यात असे घडते की, 'स्टाईल'सारख्या सिनेमात काम केल्यानंतर भारताच्या सर्वश्रेष्ठ मॅगझिनच्या कव्हरवर सलमान आणि शाहरुख खान या देशाच्या टॉपच्या सुपर्टारसोबत तुम्ही असता. मात्र यातील एका सुपरस्टारला फार वाईट वाटले. खरंतर मी नवखा होता. त्याचा फॅन होतो, कमजोर होतो. तरीही ते मला साईड रोलसाठी बोलवत राहिले, टीव्ही शोसाठी बोलवत राहिले आणि अनेक सिनेमातून मला काढून टाकले. नाव मोठे आणि लक्षण खोटे. ओळखा पाहू कोण?''

तो पुढे लिहितो, ''आता मला काही फरक पडत नाही, कारण सुशांतसिंहने त्याचा खरा चेहरा दाखवून दिलाय. जगातील हे लोक नवीन टॅलेंटला किती घाबरतात - २० वर्षामध्ये जॉन अब्राहम शिवाय इंडस्ट्रीमध्ये कोणीही मोठा स्टार आला नाही, कारण ते येऊच देत नाहीत. फक्त स्टारपुत्रांनाच काम मिळते.- याबद्दल विचार करा- सुशांतसिंहला श्रध्दांजली.''

साहिलच्या अगोदर अभिनेत्री आयेशा टाकिया, रविना टंडन आणि कंगना रनौत यांनीही बॉलिवूडमधील घाणेरड्या राजकारणाबाबत आपले अनुभव शेअर केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.