ETV Bharat / sitara

सबा पत्तोडीने शेअर केला छोटे नवाब जेहचा आजीसोबतचा फोटो - जेह अली कान पत्तोडी

करीना कपूर खानची नणंद सबा पतौडीने सोमवारी धाकट्या पुतण्या जेहचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो त्याची आजी शर्मिला टागोरसोबत दिसत आहे.

author img

By

Published : Mar 7, 2022, 4:35 PM IST

मुंबई - करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील हॉट कपल्सपैकी एक आहे. जेव्हा हे जोडपे घराबाहेर पडते तेव्हा पापाराझी त्यांच्या मागे लागतात. याशिवाय हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसह तैमूर अली खान आणि जहांगीर अली खानमुळेही चर्चेत असते. करिनासोबतच तिच्या सासरचे लोकही तिच्या मुलांची पूर्ण काळजी घेतात. आता करीना कपूर खानची नणंद सबा पतौडी हिने पुतण्या जेहचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

सबा पतौडी ही अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मोठी मुलगी आणि सैफ अली खानची बहीण आहे. सबा सोशल मीडियावर तिच्या घरातील सर्वात सक्रिय सदस्य आहे. कौटुंबिक क्षण ती कॅमेऱ्यात कैद करते आणि सोशल मीडियावर शेअर करते.

आता सबाने सोमवारी धाकट्या पुतण्या जेहचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची आजी शर्मिला टागोरसोबत खेळताना दिसत आहे. हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत सबाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बडी अम्मा और जे बाबा... फ्रेंडली... आजी-आजोबा खास पालक असतात'.

सबाने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट यापूर्वी अनेकदा तैमूर आणि जेहच्या फोटोंनी सजवले आहे. यापूर्वी सबाने तैमूरचा एक सुंदर फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तैमूर क्रीम रंगाच्या कुर्ता पायजामामध्ये क्लासिक खुर्चीवर बसला होता. हा फोटो शेअर करत सबाने कॅप्शनमध्ये लिहिले, माय बॉइज...छोटे नवाब...माशाअल्लाह...'.

करीना कपूर खानला दोन नणंदा आहेत, ज्यामध्ये सबा पतौडी मोठी आहे आणि सोहा अली खान लहान आहे. करीना कपूर खानचे सासरच्यांसोबत चांगले संबंध आहेत. खास प्रसंगी संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत असतं.

हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणे हे स्वप्न नागराज मंजुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.