ETV Bharat / sitara

‘हाऊसफुल ४’च्या सेटवरील 'मस्तीछाप' व्हिडिओ रितेश देशमुखमुळे व्हायरल - Akshay Kumar latest news

‘हाऊसफुल ४’ च्या सेटवरी एक व्हिडिओ रितेश देशमुखने शेअर केला आहे. यात बॉबी देओल आणि अक्षय कुमार सेटवर झोपलेले दिसतात.

video of Akshay and Bobby
author img

By

Published : Oct 15, 2019, 8:20 PM IST

‘हाऊसफुल ४’ आगामी चित्रपटाच्या सेटवरचा एक धमाल व्हिडिओ रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केलाय. या मस्तीछाप व्हिडिओला चाहते शेअर आणि लाईक करीत आहेत. या चित्रपटात रितेशसह अक्षय कुमार, बॉबी देओल, अभिनेत्री क्रिती सनॉन, क्रिती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या भूमिका आहेत.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओत अक्षय कुमार आणि बॉबी सेटवर झोपा काढताना दिसत आहेत. रितेश त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात करतो. हे मेहनती कलाकार किती मेहनत करीत आहेत, असे म्हणत झोपलेल्या या दोघांना तो शूट करतो.

रितेश आपल्या झोपेतील व्हिडिओ घेत आहे याची अक्षय आणि बॉबीलाही जाणीव होते आणि ते अंमळ ओशळताना दिसतात. कलाकार जेव्हा सेटवर शूट करीत असतात तेव्हा लायटिंग, सेटींग यामध्ये बराच वेळ जातो. अशावेळी झोटी वामकुक्षी कलाकार घेत असतात. याचाच फायदा उठवत रितेशने मजा मस्ती केली आहे.

‘हाऊसफुल ४’ हा ‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला चौथा चित्रपट आहे. फरहाद समजी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, साजिद नादियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २५ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राणा दुगबत्ती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिवर, जेमी लिवर आणि इतरही कलाकार यामध्ये झळकणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.