मुंबई - बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांचा शर्माजी नमकीन हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर 31 मार्च रोजी प्रीमियर होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटीवर स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हितेश भाटिया दिग्दर्शित हा चित्रपट स्ट्रीमिंग सर्व्हिसवर अॅमेझॉन ओरिजनल फिल्म म्हणून प्रदर्शित होईल, असे निर्मात्यांनी बुधवारी एका निवेदनात जाहीर केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शर्माजी नमकीन हा चित्रपट दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट आहे. त्यांचे एप्रिल 2020 मध्ये वयाच्या 67 व्या वर्षी ल्युकेमियाशी दोन वर्षांच्या लढाईनंतर निधन झाले. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने त्यांच्या मॅकगफिन पिक्चर्स या बॅनरखाली केली आहे. निर्माता हनी त्रेहान आणि अभिषेक चौबे यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
अभिनेता ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘शर्माजी नमकीन'. त्यांनी या चित्रपटाचे बरेच शूटिंग पूर्ण केले होते. परंतु काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि हा चित्रपट मधेच अडकला. निर्मात्यांनी उर्वरित भागाचे चित्रीकरण अभिनेते परेश रावल यांना घेऊन पूर्ण केले. यावर्षी ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी म्हणजेच ४ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची वेळापत्रकं कोलमडली. अखेरीस हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होत आहे.
हेही वाचा - मिशन मजनू : सिध्दार्थ मल्होत्रासोबत रश्मिकाचे बॉलिवूड पदार्पण लांबणीवर