ETV Bharat / sitara

'ओल्ड एज फिल्टर'वर ऋषी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले... - kapoor and sons

अचानक कलाकारांमध्ये वृद्ध होण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. तरीही वृद्धावस्थेतही त्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. यावर आता ऋषी कपूर यांची प्रतिक्रिया आली आहे.

'ओल्ड एज फिल्टर'वर ऋषी कपूर यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 18, 2019, 6:54 PM IST

मुंबई - सोशल मीडियावर आजकाल नवनवीन ट्रेण्ड लगेचच व्हायरल होताना पाहायला मिळतात. असंच सध्या फेस अॅपचे क्रेझ सामान्य नागरिकांसोबतच कलाकारांमध्येही पाहायला मिळत आहे. अचानक या कलाकारांमध्ये वृद्ध होण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. तरीही वृद्धावस्थेतही त्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. यावर आता ऋषी कपूर यांची प्रतिक्रिया आली आहे.

कपूर अॅन्ड सन्स चित्रपटाचं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं आहे. मला नाही माहिती तुम्हाला फेस अॅप वापरून वृद्ध बनण्यासाठी किती वेळ लागतो. मात्र मला कपूर अॅन्ड सन्सच्या चित्रीकरणावेळी यासाठी तब्बल ६ तास लागायचे. रोज ६ तास माझा मेकअप सुरू असायचा. तर तो उतरवायालाही कित्येक तास लागायचे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

  • I don’t know how long an app takes to age you but this making up took 6 hours daily for 23 days and an hour to remove. But was worth every minute of it. “Kapoor & Sons” https://t.co/5wwrnpiHlf

    — Rishi Kapoor (@chintskap) July 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच धर्मा प्रोडक्शनने कपूर अॅन्ड सन्समधील ऋषी यांचा या अवतारातील फोटो शेअर करत कोणाला ओरिजनल ओल्ड एज फिल्टर अॅप हवं आहे का? असा सवाल केला आहे. दरम्यान आतापर्यंत सोनम कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जून कपूर, वरूण धवनसारख्या अनेक कलाकारांचे ओल्ड लूक समोर आले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.