ETV Bharat / sitara

सीबीआय चौकशीसाठी बिहार सरकारच्या शिफारशीला रियाच्या वकिलाने ठरविले अवैध

रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बिहार पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास करण्याचे अधिकार नाहीत, बिहार पोलिसांनी झिरो एफआयआर मुंबई पोलिसांकडे वर्ग करावी.

Rhea Chakraborty's
रिया चक्रवर्ती
author img

By

Published : Aug 4, 2020, 5:01 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस बिहार सरकार करू शकत नाही, अशी माहिती अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी मंगळवारी दिली. राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. सुशांतच्या वडिलांनी विनंती केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी सांगितले.

अशा प्रकरणात स्थानांतरण होऊ शकत नाही, ज्याच्यात बिहार पोलीसांनी भाग घ्यावा यासाठी कोणताही कायदेशीर आधार नाही. सर्वाधिक म्हणजे, ती झिरो एफआयआर असेल जी नंतर मुंबई पोलिसात वर्ग केली जाईल," असे रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. खटल्याचे हस्तांतरण सीबीआयकडे करण्यासाठी बिहार पोलिसांना कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले.

या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार बिहार सरकारला नाही, हे लक्षात आल्यामुळे "बेकायदेशीर पद्धत" अवलंबुन आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचेही मानेशिंदे यांनी सांगितले.

यापूर्वी रिया चक्रवर्ती हिने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यात म्हटले होते की, बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे अधिकार नाहीत, कारण मुंबई पोलिसांनी यापूर्वीच अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदविला आहे.

हेही वाचा - रियाने सुशांतला तीन महिने रिसॉर्टमध्ये ठेवले होते, सुशांतच्या कुटुंबियांचा दावा

सुशांतसिंह राजपूत (34) 14 जून रोजी वांद्रे येथील उपनगरातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदविला होता आणि याप्रकरणी तपास सुरू केला आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी राजपूतची बहिण, मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि काही अन्य चित्रपटातील व्यक्तींसह ५६ लोकांचे जबाब नोंदवले आहेत.

राजपूतचे वडील के. सिंह यांनी गेल्या आठवड्यात पाटणा पोलिसात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप करीत तक्रार केली होती.

रिया चक्रवर्तीच्याविरूद्ध पटना येथे भारतीय दंड संहितेच्या कलम ३४१,३८०, ४०६, ४२०, ३०६ आणि ३४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणा पोलिसांनी 241/20 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व साक्षीदारांची जबाब नोंदवण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.