ETV Bharat / sitara

रिया आणि सुशांत यांच्या नात्यावर मित्रांनी केले भाष्य; म्हणाले... - सुशांतसिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मित्रांनी त्यांच्यात असलेल्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. मानसिक आजारामुळे सुशांतकडे अधिक लक्ष देण्यासाठी रियाने चित्रपटांच्या काही ऑफर्स नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

Rhea Chakraborty
रिया आणि सुशांत
author img

By

Published : Aug 25, 2020, 3:55 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्याबद्दल दररोज नवे खुलासे होत असताना, मित्र-मैत्रिणींनी अलीकडेच त्या दोघांमध्ये असलेल्या संबंधांविषयी खुलासा केला. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मित्राने सुशांतच्या मानसिक आजारावर उपचार घेण्यासाठी त्या दोघांनी एकत्र घेतलेल्या निर्णयाविषयी बातचीत केली. मित्राचे नाव सांगण्यात आलेले नाही.

मित्राने सांगितले की, रियाने सुशांतवर लक्ष देण्यासाठी काही चित्रपट करण्याच्या ऑफरदेखील नाकारल्या होत्या.

सुशांतला त्याचे बायपोलर डिसऑर्डरला इंडस्ट्रीपासून एक रहस्य ठेवण्याची इच्छा होती. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला स्वत: पासून वेगळे ठेवण्यास भाग पाडले, असे मित्राने सांगितले.

सुशांतच्या थेरपिस्ट सुसान वॉकर यांनी पत्रकार बरखा दत्तला यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सुशांत बायपोलर असल्याचे निदान झाले आहे. परंतु, त्याच्या कुटुंबीयांनी हा अहवाल फेटाळून लावत रियाविरोधात आत्महत्येची एफआयआर दाखल केली आहे.

या दोघांच्या मित्राने सांगितले की, ते सुशांतच्या जुन्या घरातून २०१९ मध्ये एका नवीन घरात गेले, कारण त्यांना वाटले की जुनी अपार्टमेंट त्याच्या मानसिक आरोग्यासाठी चांगली नाही. त्याला मोठे टेरेस असलेल्या घरात राहायचे होते.

हेही वाचा - सुशांतला विषबाधा झाली होती अन् शवविच्छेदनास मुद्दाम लावला विलंब, सुब्रमण्यण स्वामींचा आरोप

जेव्हा दोघे नवीन घरात गेले तेव्हा त्यांनी त्यांचे बरेच कर्मचारी वर्ग बदलले. मित्रांच्या मते सुशांतच्या मानसिक आरोग्याविषयीची माहिती गुप्त ठेवण्यासाठी आणि प्रेसवर बातमी उघड होण्यापासून रोखण्यासाठी हे केले गेले.

सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांकडून याचा तपास केला जात होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.