ETV Bharat / sitara

'गर्जने'साठी सज्ज! विद्या बालनच्या 'शेरनी'चा ओटीटीवर प्रीमियर, पोस्टर रिलीज - विद्या बालनच्या 'शेरनी'चे पोस्टर रिलीज

विद्या बालनचा आगामी ‘शेरनी’ हा चित्रपट डिजिटल रिलीजसाठी सज्ज झाला आहे. शकुंतला देवी नंतर विद्याचा हा दुसरा चित्रपट असेल जो कोरोना साथीच्या आजारामुळे ओटीटी वर रिलीज होईल.

Vidya Balan's Sherni to strike on OTT
'शेरनी'चा ओटीटीवर प्रीमियर
author img

By

Published : May 17, 2021, 8:17 PM IST

मुंबई - २०२० नंतर शकुंतला देवी चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यांतर विद्या बालनचा आणखी एक चित्रपट पुढील आठवड्यात अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. विद्या बालनचा शेरनी हा आगामी चित्रपट जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sherni to strike on OTT, new poster out
विद्या बालनच्या 'शेरनी'चे पोस्टर रिलीज

यावर्षी जूनमध्ये हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर येणार असल्याचे शेरनीच्या निर्मात्यांनी सोमवारी जाहीर केले. या टीमने चित्रपटाचे नवीन पोस्टरही शेअर केले असून अद्याप रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. भूषण कुमारच्या टी-सीरिज आणि विक्रम मल्होत्राच्या अबुदान्तिया एन्टरटेन्मेंटने याची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसुरकर यांनी केले आहे. मसूरकर यांनी न्यूटन हा गाजलेला चित्रपट २०१७ मध्ये बनवला होता.

अबुदान्तिया एन्टरटेन्मेंटने ट्विटरवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आणि लिहिलंय की, "शरेनी गर्जना करण्यासाठी सज्ज झालीय. प्राईम व्हिडिओवर आमचा नवा सिनेमा शेरनी प्रीमियर होणार आहे, याची घोषणा करताना आनंद होत आहे. विद्या बालन पुन्हा एकदा पार्टनर म्हणून आहे याचा अभिमान वाटतो. याचे दिग्दर्शन अमित मसूरकर यांनी केले असून कथा अस्था टिकू यांची आहे."

विद्या बालन या चित्रपटात वन-अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी असून मनुष्य आणि प्राण्यांच्या संघर्षाचा ती शोध यात घेताना दिसेल.

हेही वाचा - Cyclone Tauktae LIVE Updates : तौक्तेची तीव्रता वाढली; मुंबईत लोकल वाहतूक ठप्प, विमान सेवेवरही परिणाम..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.