ETV Bharat / sitara

बिग बी आणि गोविंदासोबत लंच करीत होती रवीना टंडन - बड़े मियां छोटे मियां

अमिताभ बच्चन आणि गोविंदा या दिग्गज कलाकारांसोब काम करण्याची संधी अभिनेत्री रविना टंडनला मिळाली होती. 'बड़े मियां छोटे मियां' या चित्रपटाच्या सेटवरील अनुभव भन्नाट होते, असे तिने सांगितलंय. तसेच ती या दोघा दिग्गजांसोबत लंचही करीत असल्याची आठवण तिने शेअर केली आहे.

Raveena Tandon with Amitabh
बिग बी आणि गोविंदासोबत रविना टंडन
author img

By

Published : Oct 17, 2020, 4:36 PM IST

मुंबई - डेव्हिड धवनचा विनोदी चित्रपट 'बड़े मियां छोटे मियां'ला 22 वर्षे पूर्ण झाली. याप्रसंगी अभिनेत्री रवीना टंडन हिने एक मनोरंजक किस्सा शेअर केला आणि चित्रपटाशी संबंधित तिचा अनुभव सांगितला.

1998च्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि गोविंदा डबल रोलमध्ये दिसले होते. रवीनाने गोविंदाच्या मैत्रिणीची भूमिका केली होती, तर राम्या कृष्णनची अमिताभसोबत जोडी होती.

रवीना म्हणाली, "हा एक अतिशय खास चित्रपट आहे. शूटिंग दरम्यान आम्हाला खूप मजा आली. मला वाटते की, हा माझ्या काळातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा आहे आणि चाहत्यांना मला मोठ्या पडद्यावर गोविंदा आणि अमितजींसोबत पाहणे खूप आवडले. खरं तर 22 वर्षे पूर्ण झाली आहेत असे वाटत नाही आणि 'बडे मियां छोटी मियां' चा भाग असल्याचा मला खूप आनंद झाला आहे. "

रवीनाने 'बडे मियां छोटी मियां'च्या सेटवरील एक अनुभव शेअर केला.

ते म्हणाले, "या सेटवरील बऱ्याच आठवणी आहेत, पण माझ्यासाठी सर्वात भारी गोष्ट म्हणजे आम्ही जो एकत्र वेळ घालवत होतो. गोविंदा आणि अमितजी खूप अद्भूत सह-कलाकार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मला खूप मजा आली. दुपारचे जेवण आम्ही एकत्र शेअर करीत होतो, हे मला अजूनही आठवते. या आठवणी माझ्या हृदयाच्याजवळ कायम असतील."

रवीना लवकरच 'केजीएफ : चॅप्टर 2'मध्ये दिसणार असून ती रामिका सेन ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.