मुंबई - तेलुगू अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आज 'मिशन मजनू' या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाने सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासह लखनौमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. 'मिशन मजनू' हा एक स्पाय थ्रिलर आहे आणि दक्षिण भारतीय स्टार असलेल्या रश्मिकाची या प्रकारच्या शैलीत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अभिनेत्रीने तेलुगू चित्रपटातील गीता गोविंदम आणि सारिलेरू नीकेववारू सारख्या हिट रोमँटिक चित्रपटातून काम केले आहे.
रश्मिकाने शुक्रवारी सोशल मीडियावर घोषणा करताना लिहिलंय की, तिने 'मिशन मजनू' या चित्रपटाच्या टीमसोबत काम सुरू केले आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मिशन मजनू पहिला दिवस."
शंतनू बागची यांचे दिग्दर्शन असलेला मिशन मजनू हा चित्रपट हेरगिरी थ्रिलर चित्रपट आहे. १९७०च्या दशकातील वास्तविक घटनांनी प्रेरित असलेल्या या चित्रपटात भारताच्या महत्वाकांक्षी गुप्त कारवाईवर आधारित कथा यात पाहायला मिळणार आहे. परवीज शेख, असीम अरोरा आणि सुमित बथेजा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण लखनौ आणि मुंबईत होणार आहे. या वर्षाच्या शेवटी चित्रपट रिलीज होणार आहे.
हेही वाचा - LIVE : अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला