ETV Bharat / sitara

कार जप्तीनंतर रणवीर शौरीने मागितली पोलिसांची मदत, मुंबई पोलिसांनी दिले हे उत्तर - रणवीर शौरीची कार पोलिसांनी जप्त केली

अभिनेता रणवीर शौरी आपल्या घरच्या नोकराच्या पत्नीला बाळंतपणासाठी रुग्णालयात घेऊन जात होता. त्यावेळी त्याची गाडी जोगेश्वरी पोलिसांनी जप्त केली आहे. मुलाचा जन्म ही गोष्ट मेडिकल इमर्जन्सीमध्ये बसत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे होते. याबद्दल ट्विटरवरुन शौरीने मुंबई पोलिसांकडे दाद मागितली आहे.

Ranvir Shorey
रणवीर शौरी
author img

By

Published : May 21, 2020, 8:16 PM IST

मुंबई - अभिनेता रणवीर शौरीची कार मुंबई पोलिसांनी जप्त केली आहे. तो घरातील नोकराला मेडिकल इमर्जन्सीमध्ये घेऊन जात असताना ही कारवाई झाल्याचे रणवीरचे म्हणणे आहे.

  • @MumbaiPolice My car being impounded for taking my household help for his wife’s delivery to hospital. Officer in charge says a child being delivered is not an emergency. Please advise.

    — Ranvir Shorey (@RanvirShorey) May 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रणवीरने यानंतर ट्विटरची एक मालिकाच सुरू केली. आपल्यावर पोलिसांकडून कसा अन्याय झालाय याचा पाढाच त्याने ट्विटरवर वाचून दाखवलाय. त्याने म्हटलंय की, त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराच्या गर्भवती पत्नीला तो रुग्णालयात घेऊन जात होता. मुलाचा जन्म ही गष्ट इमर्जन्सी असू शकत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्याने त्याला बोलून दाखवले. शौरीने ट्विटरवर लिहिलंय, '@MumbaiPolice माझ्या घरातील नोकराच्या पत्नीला बाळंतपणासाठी घेऊन जात असताना माझी कार जप्त करण्यात आली आहे. इन्चार्ज ऑफिसरने सांगितले की मुलाचा जन्म ही गोष्ट इमर्जन्सीमध्ये बसत नाही. प्लिज मला सल्ला द्या.'

जोगेश्वरी हायवे पोलीस चौकीच्या इन्चार्जने एफआयआर दाखल करण्याचा आणि कार जप्त करण्याचा निर्णय घेतला. रणवीरने हा जाणीवपूर्वक शोषणाचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. ऑफिसर याबद्दल प्रेसशीही बोलत होता. रणवीरने पुढे म्हटलंय,''तीन तासानंतरही माझ्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही... @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra.'

त्याने पुढे म्हटलंय की, ''तिघेजणही ६ तास पोलीस स्टेशनमध्येच होते. तीन लोकांना ६ तास वाट पहावी लागली. आम्हाला शिक्षा केली जात आहे का?@MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra.'' अभिनेता रणवीर शौरीच्या या ट्विट्सला उत्तर देताना मुंबई पोलिसांच्यावतीने उत्तर मिळालंय की, लवकरच या प्रकरणाची निर्गत लावण्यात येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.