मुंबई - १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या ऐतिहासिक कामगिरीवर आधारित '८३' हा चित्रपट बनतोय. यात अभिनेता रणवीर सिंग अष्टपैलू क्रिकेटर आणि '८३' विश्वचषकाचे कप्तान कपील देव यांची भूमिका साकारतोय. गेली ६ महिने क्रिकेटचे ट्रेनिंग घेतल्यानंतर रणवीर शूटींगच्या पहिल्या सत्रासाठी लंडनला चाललाय.
रणवीर सिंगने या विषयावर आमच्या प्रतिनिधीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. यात त्याने घेतलेल्या ट्रेनिंगबद्दल, कपील देव यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सविस्तर बातचित केली आहे.