ETV Bharat / sitara

'८३'साठी कलाकारांनी असं घेतलं प्रशिक्षण, रणवीरनं शेअर केला व्हिडिओ - kapil dev

आता रणवीरने चित्रपटासाठी प्रशिक्षण घेतानाचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग कपिल देव यांच्याकडून प्रशिक्षण घेताना दिसत आहे.

रणवीरनं शेअर केला ८३ च्या सेटवरील व्हिडिओ
author img

By

Published : Apr 20, 2019, 12:50 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली आहे. कारण याच दिवशी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वकरंडक जिंकला होता. याच विजयावर चित्रपटाची कथा आधारित असणार आहे.

रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेताना दिसत आहे. आता रणवीरने चित्रपटासाठी प्रशिक्षण घेतानाचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग कपिल देव यांच्याकडून प्रशिक्षण घेताना दिसत आहे. यात कपिल देव त्याला क्रिकेटमधील बारकावे शिकवत असून कोणत्या परिस्थितीमध्ये कसं सामोरं जावं याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. तर इतरही कलाकार आपल्या भूमिकेसाठी प्रशिक्षण घेत आहेत.

‘चक दे इंडिया’चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच ‘८३’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. २०२० मध्ये १० एप्रिलला उत्तम कथा आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याची रणवीर आणि कपिल देव यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.