ETV Bharat / sitara

जेव्हा रिल आणि रिअल लाईफ कपिल देव येतात एकत्र, पाहा फोटो

रणवीरने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. यात कपिल देव रणवीरला प्रशिक्षण देताना दिसत आहेत

रिल आणि रिअल कपिल देव
author img

By

Published : Apr 6, 2019, 2:18 PM IST

मुंबई - दिग्दर्शक कबीर खान हे १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वकरंडकाचा रंजक प्रवास आपल्या '८३' या चित्रपटात उलगडत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. आता रिअल लाईफ आणि रिल लाईफ कपिल देव यांचा फोटो समोर आला आहे.

रणवीरने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. यात कपिल देव रणवीरला प्रशिक्षण देताना दिसत आहेत. कपिल देव यांची भूमिका साकारण्यात रणवीर यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान चित्रपटात इतरही अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

'८३' या चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथच्या बरोबरीने चिराग पाटील हा त्याचेच वडील संदिप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.