मुंबई - दिग्दर्शक कबीर खान हे १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वकरंडकाचा रंजक प्रवास आपल्या '८३' या चित्रपटात उलगडत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटात इतर क्रिकेटरच्या भूमिकेत कोणते कलाकार भूमिका साकरणार, त्यांची नावे जाहीर करण्यात आली होती.
आता चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा फोटो रणवीरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन , जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार पाहायला मिळत आहेत.
- View this post on Instagram
KAPILS DEVILS DESCEND ON DHARAMSHALA!!! 😈🏏 it’s on!!! @83thefilm @kabirkhankk
">
'८३' या चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथच्या बरोबरीने चिराग पाटील हा त्याचेच वडील संदिप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.