हैदराबाद - बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपटसृष्टीतील ‘पद्मावती’ दीपिका पदुकोण त्यांच्या नुकत्याच झालेल्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘८३’ च्या शानदार यशानंतर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सोमवारी मालदीवला रवाना झाले. हे जोडपे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. दोघांचा लूक अप्रतिम दिसत होता. यंदाच्या वर्षाचा निरोप घेताना आजच्या इयर एंडमध्ये आपण त्या जोडप्यांबद्दल जाणून घेणार आहत ज्यांनी मालदीवचा समुद्र किनारा एन्जॉय करण्यासाठी निवडला होता. हैदराबाद - बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपटसृष्टीतील ‘पद्मावती’ दीपिका पदुकोण त्यांच्या नुकत्याच झालेल्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘८३’ च्या शानदार यशानंतर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सोमवारी मालदीवला रवाना झाले. हे जोडपे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. दोघांचा लूक अप्रतिम दिसत होता. यंदाच्या वर्षाचा निरोप घेताना आजच्या इयर एंडमध्ये आपण त्या जोडप्यांबद्दल जाणून घेणार आहत ज्यांनी मालदीवचा समुद्र किनारा एन्जॉय करण्यासाठी निवडला होता.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील ग्लॅमरस जोडप्यांपैकी एक आहे. सोमवारी मुंबई एअरपोर्टवर दोघांचा लूक पाहण्यासारखा होता. रणवीर-दीपिकाची जोडी चित्रपट प्रमोशन, लंच, डिनर आणि एअरपोर्ट लूक्सने नेहमीच चर्चेत असते.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
यावर्षी ऑक्टोबरमध्ये बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत फॅमिली व्हेकेशनमध्ये मालदीवमध्ये एन्जॉय करण्यासाठी गेला होता. हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांनाही सोबत घेऊन गेले होते.
सैफ अली खान-करीना कपूर खान
यावर्षी, करीना कपूर खान तिच्या वाढदिवसानिमित्त (21 सप्टेंबर) पती सैफ अली खानसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करायला गेली होती. करिनाने तिथून तिच्या आनंदी आणि छोट्या कुटुंबाचे फोटो शेअर केले होते.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय, बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एकमानले जाते. हे देखील यावर्षी मालदीवमध्ये बर्थडे साजरा करण्यासाठी आले होते. हा प्रसंग होता आराध्याचा 10 वा वाढदिवस (16 नोव्हेंबर) आणि या जोडप्याने येथे मुलीच्या वाढदिवसाला मोठी धमाल केली होती.
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने
बॉलिवूडची 'धक-धक' गर्ल माधुरी दीक्षित तिच्या कुटुंबासह यावर्षी एप्रिल महिन्यात मालदीवमध्ये एन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी अभिनेत्रीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीही मालदीवच्या व्हेकेशनचे सुंदर फोटो शेअर केले होते.
आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप
बॉलिवूडचा 'विकी' म्हणजेच आयुष्मान खुराना पत्नी ताहिरा कश्यपसोबत या वर्षी ऑक्टोबरमध्ये मालदीवमध्ये मौजमजा करण्यासाठी गेला होता. अभिनेत्याने मालदीवमधील पत्नी ताहिरासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर
प्रसिद्ध जोडपे बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे देखील मालदीवच्या सुट्टीवर जाणाऱ्या विवाहित जोडप्यात सामील होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये हे जोडपे मालदीवमध्ये एन्जॉय करण्यासाठी आले होते.
राहुल वैद्य आणि दिशा परमार
गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांनी यावर्षी लग्नगाठ बांधली, त्यांनी आपला हनीमून मालदीवमध्ये साजरा केला. त्यावेळी राहुलने आपला ३४ वा वाढदिवसही मालदीवमध्ये साजरा केला.
आयुष शर्मा आणि अर्पिता शर्मा
सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा पत्नी अर्पिता खान शर्मासोबत यंदाचा बर्थडे साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचला होता. 3 ऑगस्ट रोजी अर्पिता खानचा वाढदिवस होता. याकरीत हे जोडपे सेलिब्रेशनसाठी मालदीवमध्ये पोहोचले होते.
हेही वाचा - सलमान कॅटरिनाच्या प्रेमाची अधुरी एक कहानी