ETV Bharat / sitara

राणीची राजस्थानमधील 'मर्दानी' पूर्ण, शेअर केला फोटो

या चित्रपटाचं राजस्थानमधील शेड्यूल पूर्ण झालं आहे. यश राज फिल्मसच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर करून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

राणीची राजस्थानमधील 'मर्दानी' पूर्ण
author img

By

Published : May 29, 2019, 3:22 PM IST

मुंबई - 'मर्दानी' या चित्रपटातून बिनधास्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी राणी मुखर्जी पुन्हा एकदा मर्दानीच्या रूपात दिसणार आहे. या चित्रपटाचा सिक्वल 'मर्दानी २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे.

आता या चित्रपटाचं राजस्थानमधील शेड्यूल पूर्ण झालं आहे. यश राज फिल्मसच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर करून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा हा फोटो आहे. यात सर्वांनी मर्दानी २ असे लिहिलेले टी शर्ट घातले आहेत. तर संपूर्ण टीमच्या मधोमध राणी मुखर्जी बसलेली दिसत आहे.

दिग्दर्शक गोपी पुथरन हे 'मर्दानी २' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. गोपी यांनीच 'मर्दानी'ची पटकथा लिहिली होती. राणीचा पती आदित्य चोप्रा या सिक्वेलचा निर्माता असणार आहे. प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच २०१९ मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

ENT 06

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.