ETV Bharat / sitara

‘डॉक्टर जी’मध्ये रकुल प्रीत सिंग असणार आहे आयुष्मान खुरानाची ‘सिनियर’! - Rakul Preet Singh latest news

जंगली पिक्चर्सने आपल्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली, ज्याचे नाव आहे ‘डॉक्टर जी’. यात आयुष्मान खुराना डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगची सुद्धा वर्णी लागली असून ती आयुष्मानच्या ‘सिनियर’ ची भूमिका साकारणार आहे.

‘डॉक्टर जी
author img

By

Published : Feb 1, 2021, 7:50 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे जगभरात ‘डॉक्टर’ या संज्ञेला विशेष महत्व प्राप्त झाले. तसं बघायला गेलं तर आपल्या चित्रपटांतून ‘डॉक्टर’ची व्यक्तिरेखा, ‘अब दवा की नहीं दुआ की जरुरत है’ किंवा ‘अच्छा हुआ इन्हे वक्तपर लेके आये, थोडी देर हो जाती तो....’ असे किंवा तत्सम संवादांपुरती मर्यादित होती. डॉक्टर ही व्यक्तिरेखा मुख्य भूमिकेत घेऊन बनलेले चित्रपट हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतही नाहीत. जंगली पिक्चर्स एक नवीन चित्रपट घेऊन येताहेत जो ‘डॉक्टरी’ जीवनावर बेतलेला आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये जंगली पिक्चर्सने आपल्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली, ज्याचे नाव आहे ‘डॉक्टर जी’. यात आयुष्मान खुराना डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता त्याच्या जोडीला अजून एक ‘डॉक्टर’ जोडली गेलीय. ‘डॉक्टर जी’ मध्ये रकुल प्रीत सिंगची सुद्धा वर्णी लागली असून ती आयुष्मान च्या ‘सिनियर’ ची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटातून मेडिकल कॅम्पसमधील घडामोडी कॉमेडी रूपात सादर करण्यात येणार आहेत. आयुष्मान डॉ. उदय गुप्ताच्या भूमिकेत असून रकुल डॉ. फातिमाच्या भूमिकेत दिसेल. आयुष्मान व रकुल ही नवीनतम फ्रेश जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्माते व्यक्त करताहेत. मुख्यधारेच्या सिनेमात आपण पाहिलेल्या गोष्टींपेक्षा वेगळी संकल्पना या चित्रपटातून मांडण्यात येईल.

‘जंगली पिक्चर्स’ सोबत काम करण्याबद्दल रकुल म्हणाली, “‘डॉक्टर जी’ चा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साही आहे. या चित्रपटात मी प्रथमच आयुष्मान सोबत काम करतेय, जंगली सोबत पण पहिलाच चित्रपट आहे. त्याचप्रमाणे अनुभूती कश्यप सोबतही पहिलेच काम, त्यामुळे माझा आनंद त्रिगुणित झाला आहे. चित्रपटाची संहिता ऐकताच मी तिच्या प्रेमात पडले. वैद्यकीय नाट्य व ‘कॅम्पस’ कॉमेडी याचा उत्तम मिलाफ यात आहे. तसेच ही एक अतिशय रोचक संकल्पना आहे जी प्रेक्षकांसाठी ‘डॉक्टर’ संदर्भात नवीन दृष्टीकोन आणेल. मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी तीव्रतेने वाट बघतेय.”

दिग्दर्शक अनुभूती कश्यपदेखील म्हणतात, “दोन प्रतिभावान व्यक्ती एकत्र येताना पाहून नेहमीच आनंद व उत्तेजना वाढलेली असते. ‘डॉक्टर जी’ साठी आम्हाला एक अतिशय रोचक जोडी हवी होती आणि आम्हाला आनंद आहे की आयुष्मान आणि रकुल आमच्याबरोबर आहेत. त्यांची ऑन-स्क्रीन जोडी चित्रपटातल्या पात्रांप्रमाणेच ताजी आहे आणि त्यांची उर्जा आणि केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी अनोखा आणि स्फूर्तीदायक अनुभव ठरेल ”.

जंगली पिक्चर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता पांडे यांनी सांगितले की, “‘डॉक्टर जी’ ही एक अशी गोष्ट आहे जी आम्हा सर्वांच्या मनापासून अगदी जवळ आहे. आम्ही रकुल या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांच्या मैफिलीत सामील करून घेण्यास खूप उत्सुक आहोत. तिच्या आधीच्या सिनेमांमधून तिने अभिनेत्री म्हणून आपले अभिनय-कौशल्य सिद्ध केले आहे आणि भारतभरातील प्रेक्षक तिच्यावर आधीपासूनच प्रेम करतात. प्रेक्षकांप्रमाणेच आम्हीसुद्धा आयुष्मान-रकुल च्या जोडीची बहारदार जुगलबंदी बघण्यास उत्सुक आहोत.”

आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाचे सह-लेखन आणि दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार असून चित्रपटाचे लेखन सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भरत यांनी केले आहे.

‘डॉक्टर जी’च्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होणार आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हात सैल - भुजबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.