मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या संबंधात वादग्रस्त व्हिडिओ बनविणाऱ्या राखी सावंतला नेटकऱ्यांनी अक्षरशः झोडपून काढले आहे.
तिच्या ताज्या व्हिडिओमध्ये राखी असा दावा करतांना दिसते की सुशांतसिंह राजपूत तिच्या स्वप्नात आला होता आणि म्हणाला की राखीचा मुलगा म्हणून पुन्हा जन्म घेईल. नेटिझन्सनी तिचा इन्स्टाग्रामवर निर्दयतेने ट्रोल केल्याने राखी अडचणीत आली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा संवेदनशील व्हिडिओ अशा वेळी आला आहे जेव्हा सुशांतच्या आत्महत्येने मृत्यूने देशाला हादरवून सोडले आहे. सुशांत १४ जून, २०२० रोजी वांद्रे येथील निवासस्थानी फॅनला लटकलेला आढळला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता.