मुंबई - राखी सावंत आणि मीका सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे दोघेही तब्बल 15 वर्षानंतर मुंबईतील कॉफी शॉपच्या बाहेर भेटताना दिसत आहेत. बऱ्याच वर्षांच्या वादानंतर जेव्हा दोघांची भेट झाली, त्यावेळी दोघेही एकमेकांचे कौतुक करताना दिसले. बिग बॉसमध्ये सामील झाल्याबद्दल मीका सिंगने राखी सावंतचे कौतुक केले तर राखी सावंतही मीका सिंगच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना दिसली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
राखी सावंत कॉफी शॉपवर हौशी फोटोग्राफर्सबोलत असताना, मीका सिंह तेथे पोहोचला आणि राखी सावंतला मिठी मारली. तो म्हणाला की आता आम्ही चांगले मित्र आहोत. यानंतर मीका सिंह व्हिडिओमध्ये असे सांगताना दिसला की इथून जात असताना तिला राखी दिसली आणि तो तिच्या भेटीसाठी मुद्दाम आला. बिग बॉस शो राखीमुळे चालला असेही तो म्हणाला. मीका सिंगच्या तोंडून हे कौतुक ऐकून राखी सावंतने त्याच्या पायाला स्पर्श केला.
यानंतर राखी सावंत यांनी कोरोना साथीच्या वेळी मिकाने कशी मदत केली हे सांगितले. जेव्हा जेव्हा एखादी साथीची किंवा पूरसदृश परिस्थिती उद्भवते तेव्हा मीका सिंह मोठ्या मनाने पुढे येतो. विशेष म्हणजे २००६ मध्ये मीका सिंहने तिच्या संमतीशिवाय राखी सावंतचे तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत चुंबन घेतले होते, त्यानंतर एक मोठा वादंग निर्माण झाला होता.
हेही वाचा - दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या हृदयावर झाली शस्त्रक्रिया!