चंदीगड : बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावने अखेर दीर्घकाळापासूनची मैत्रीण पत्रलेखासोबत लग्नगाठ बांधण्याचा निश्चय केला आहे. बॉलीवूडमधील स्वीट कपल म्हणून चर्चेत असलेल्या या जोडीचा साखरपुडा चंदीगडमध्ये शनिवारी संपन्न झाला. याचे फोटो आणि व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे.
मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा
चंदीगडमध्ये पार पडलेल्या छोटेखानी कौटुंबिक समारंभात हा साखरपुडा संपन्न झाला. मोजके निमंत्रित या सोहळ्यात सहभागी झाले होते. साखरपुड्यासाठी दोघांनीही पांढऱ्या रंगातील मनमोहक आऊटफिट परिधान केले होते. पत्रलेखाने पांढऱ्या रंगांचा लाँग ट्रेल गाऊन परिधान केला होता. तर राजकुमारने पांढऱ्या रंगाच्या शेरवानी परिधान केली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
व्हिडिओ व्हायरल
साखरपुड्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यात राजकुमार गुडघ्यावर बसून पत्रलेखाला वेडींग रिंग घालतो. तर पत्रलेखाही गुडघ्यावर बसून राजकुमारला वेडींग रिंग घालताना दिसते. याशिवाय दोघांनी एकमेकांसोबत कपल डान्सही केला. यावेळी उपस्थित पाहुणे मंडळी या दाम्पत्याला चीअर करत होते.
विवाहाच्या तारखेविषयी घोषणा नाही
पत्रलेखा आणि राजकुमारने सिटीलाईटस् या चित्रपटात एकमेकांसोबत काम केले होते. हे दोघे दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आधीपासूनच चर्चेत होत्या. दरम्यान, विवाहाच्या तारखेविषयी अद्याप काहीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.