ETV Bharat / sitara

धनुषसोबत घटस्फोट झाल्यानंतर रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण - ऐश्वर्या धनुष घटस्फोट

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऐश्वर्या ही दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील एक दिग्दर्शिका आणि गायिका आहे. ऐश्वर्या हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शिका म्हणून हात आजमावणार आहे.

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत
रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत
author img

By

Published : Mar 21, 2022, 11:19 AM IST

हैदराबाद - दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऐश्वर्या साउथमधील एक दिग्दर्शिका आणि गायिका आहे. ऐश्वर्या हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शिका म्हणून हात आजमावणार आहे. चित्रपटाचे शीर्षकही निश्चित झाले आहे. निर्माती मीनू अरोरासोबत ऐश्वर्या तिचा पहिला बॉलिवूड प्रोजेक्ट सुरू करणार आहे. हा एक प्रेमकथा असलेला चित्रपट असेल, जो सत्यकथेवर आधारित आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्या 'ओ साथी चल' नावाचा हिंदी चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. निर्मात्या मीना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाची स्टारकास्ट अजून निवडायची आहे. ऐश्वर्याबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच तिच्या मुसाफिर या गाण्याने चर्चेत आली होती. याआधीही ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

ऐश्वर्याचा घटस्फोट झाला आहे

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने 2004 मध्ये साऊथ अभिनेता धनुषसोबत लग्न केले आणि या वर्षाच्या सुरुवातीला दोघे वेगळे झाले. दोघांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. अद्याप त्यांच्या विभक्त होण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

विभक्त झाल्यानंतर दोघांनीही मुलांची जबाबदारी उचलली आहे. धनुष त्याच्या कामात व्यग्र असेल तर मुलांना ऐश्वर्याच्या घरी सोडले जाते आणि ऐश्वर्या कामात असताना मुलांना धनुषच्या घरी पाठवले जाते. अशा प्रकारे दोघे मिळून मुलांची काळजी घेत आहेत.

धनुषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीत त्याचे नाणे जोरदार चालते. त्याचबरोबर त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. नुकताच धनुष अतरंगी रे या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो सारा अली खानसोबत दिसला होता. या चित्रपटात अक्षय कुमारचीही महत्त्वाची भूमिका होती.

हेही वाचा - Video : प्रत्येक भारतीयाने 'द काश्मीर फाईल्स' पाहावा आमिर खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.