ETV Bharat / sitara

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचं शिर्षक ठरलं, 'या' अभिनेत्रीसोबत साकारणार तिसऱ्यांदा भूमिका

सन पिक्चर्सच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओतून रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटाचे शिर्षक जाहीर करण्यात आले आहे.

author img

By

Published : Feb 25, 2020, 12:12 PM IST

Rajinikanth Upcoming film, रजनीकांत यांचा आगामी चित्रपट, Rajinikanth news, Rajinikanth latest news, Rajinikanth role with nayantara, Rajinikanth films
रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचं शिर्षक ठरलं, 'या' अभिनेत्रीसोबत साकारणार तिसऱ्यांदा भूमिका

चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा मागच्या वर्षी 'दरबार' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार व्यवसाय केला आहे. यानंतर ते कोणत्या चित्रपटात झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. त्यांच्या आगामी चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. अखेर त्यांच्या आगामी चित्रपटाचे शिर्षकही ठरले आहे.

'अन्नाअथे', असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. सन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर, डी. इमान हे या चित्रपटाला संगीत देणार आहेत. ते रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी पहिल्यांदाच काम करणार आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार डबल रोल, 'अशी' असणार भूमिका

सन पिक्चर्सच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओतून रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटाचे शिर्षक जाहीर करण्यात आले आहे.

या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नयनतारासोबत रजनीकांत यांचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी २००५ साली 'चंद्रमुखी' आणि मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दरबार' चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

'अन्नाअथे' चित्रपटात किर्ती सुरेश, खुशबू, प्रकाश राज, सतीश आणि सुरी यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. सध्या हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

हेही वाचा -प्रविण तरडेंच्या 'या' सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये 'भाईजान' साकारणार भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.