काही दिवसांपूर्वी ‘राधे श्याम’ च्या टीमने ‘दशकातील सर्वात मोठी प्रेमाची घोषणा व्हॅलेंटाईन डे ला करणार’ असे सांगितले होते व त्यांनी त्यांचे वाचन पाळले आहे. १४ फेब्रुवारीला त्यांनी ‘राधे श्याम’ च्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली असून येत्या पावसाळ्यात ३० जुलै २०२१ ला चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. त्यांनी एक खास झलकही प्रदर्शित केली आहे. ऑडियन्सचा 'डार्लिंग' प्रभासचे पोस्टर आणि या प्रोजेक्टची एक झलक असो, पॅन-इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राधे श्याम’ बद्दल उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. बहुप्रतिक्षित 'राधेश्याम' च्या निर्मात्यांनी हा ‘व्हॅलेंटाईन ’आठवडा अधिक प्रेमळ आणि संस्मरणीय बनविला आहे.
हा व्हिडिओ निसर्गरम्य रोमच्या आजूबाजूच्या जंगलातून धावणाऱ्या ट्रेनमधून सुरू होतो. इटलीमधील इतिहासकालीन रोम शहरातील गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवर प्रभास इटालियन भाषेत पूजा बरोबर ‘फ्लर्ट’ करताना दिसतोय. तो म्हणतोय, 'Sei Un Angelo? Devo Morire per incontrarti?’. याचा अर्थ काय हे माहित करून घेण्यासाठी लाखो-करोडो लोकांनी इंटरनेटवर प्रश्नांचा पाऊस पाडला. रोमसारख्या मोहक शहरातील रस्ते आणि आजूबाजूचा परिसर अशा सुंदर आणि लक्षवेधी लोकेशन्स ‘राधे श्याम’ च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना व्हॅलेंटाईनची भेट म्हणून दिली आहेत. चित्रपटाची झलक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. चित्रपटाला दशकाची सर्वात मोठी लव्हस्टोरी मानली जात आहे आणि प्रभास जवळजवळ एका दशकानंतर रोमँटिक भूमिकेत दिसेल.या चित्रपटात पॅन-इंडिया स्टार प्रभास आणि २०१० ची तिसऱ्या स्थानावरील ‘मिस युनिव्हर्स’ पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत आणि त्यांना रोमांस करताना पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहेच. 'राधेश्याम' हा बहुभाषिक चित्रपट असेल आणि यूव्ही क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माण होतोय. निर्मितीच्या अग्रस्थानी असलेल्या राधा कृष्ण कुमार आणि गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत ‘राधेश्याम’ या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वंशी आणि प्रमोद यांनी केली आहे.दशकाची सर्वात मोठी लव्हस्टोरी 'राधेश्याम’ येत्या ३० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्त अमृता फडणवीसांचं ‘ये नयन डरे डरे’ प्रदर्शित