ETV Bharat / sitara

निर्माता रमेश तौरानी यांची फसवणूक, त्यांच्या ३५६ कर्मचाऱ्यांना दिले ‘फेक वॅक्सीन’?

टिप्स इंडियाचे सर्वेसर्वा रमेश तौरानी सध्या चिंताग्रस्त आहेत कारण त्यांच्या कर्मचाऱ्यांना खोटी लस दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. औषधांचा आणि ऑक्सिजनचा काळाबाजार होत होता आणि आता कोरोनावर मात करण्यासाठी आलेल्या लस संदर्भातही काळाबाजार होताना दिसतोय.

Producer Ramesh Taurani
निर्माता रमेश तौरानी
author img

By

Published : Jun 18, 2021, 5:33 PM IST

कोरोना आला आणि देशात हाहाकार माजविला. त्याच्याशी लढण्यासाठी वॅक्सीनची निर्मिती करण्यात आली परंतु आता काही ठिकाणी त्यावरूनही हाहाकार माजताना दिसतोय. इथे राजकारणीय काहीच नाहीये तर इथे लोकांच्या आयुष्याचा, तब्येतीचा प्रश्न आहे. टिप्स इंडियाचे सर्वेसर्वा रमेश तौरानी सध्या चिंताग्रस्त आहेत कारण त्यांच्या कर्मचाऱ्यांना खोटी लस दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. औषधांचा आणि ऑक्सिजनचा काळाबाजार होत होता आणि आता कोरोनावर मात करण्यासाठी आलेल्या लस संदर्भातही काळाबाजार होताना दिसतोय.

मुंबई बनावट लस घोटाळ्याप्रकरणी टिप्स इंडस्ट्रीजच्या रमेश तोरानी यांची फसवणूक करण्यात आली आहे असे निदर्शनास येतेय. टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख असलेले बॉलिवूड चित्रपट निर्माते रमेश तोरानी यांच्या ३५६ कर्मचाऱ्यांचे ३० मे ते ३ जून दरम्यान लसीकरण झाले, परंतु अद्याप त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीमध्ये झालेल्या लसीकरण संदर्भात संशय व्यक्त केला जाऊ लागताच रमेश तौरानी यांनादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिल्या गेलेल्या लसीबद्दल संभ्रम वाटू लागला. कारण दोन्ही ठिकाणी लसीकरण आयोजन करणारा एकच इसम होता. एसपी इव्हेंट्सचा संजय गुप्ता. शासनाने गृहनिर्माण संस्था आणि मोठ्या कंपन्यांना आपापल्या लोकांचे लसीकरण करून घेण्यासाठी परवानगी दिली असल्यामुळे तौरानी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण प्रोग्रॅम आयोजित केला होता. त्यासाठी संजय गुप्ता यांच्याशी रीतसर करारही झाला होता. संजय गुप्ताने सांगितले होते की कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलतर्फे आम्ही लसीकरण करू.

तौरानी यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ३० मे ते ३ जूनपर्यंत हा प्रोग्रॅम राबविला गेला होता. लसीकरण झाल्यावर ‘व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट’ची मागणी केली असता ते नंतर पाठविण्यात येईल असे लसीकरण संस्थेच्या सदस्यांकडून सांगण्यात आले. काही दिवसांनी विचारपूस केल्यानंतर काहींना सर्टिफिकेट्स मिळाली परंतु ती दुसऱ्याच हॉस्पिटलच्या नावाने आली होती. तसेच लसीकरणादरम्यान कोणतीही कॉम्प्युटर नोंद होताना कोणी बघितली नव्हती. या तफावतींमुळे रमेश तौरानी यांचा संशय बळावला आणि त्यांना फसवणूक झाल्याचे ध्यानात आले. ते रीतसर पोलिसांत तक्रार नोंदविणार असून त्यांनी एक स्टेटमेंट जारी केले आहे.

याविषयी बोलताना रमेश तौरानी म्हणाले की, "होय, आम्ही अद्याप प्रमाणपत्रांची प्रतीक्षा करीत आहोत आणि जेव्हा माझ्या कार्यालयातील लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला (संजय गुप्ता, एसपी इव्हेंट्स), तेव्हा ते म्हणाले की शनिवारी (१२ जून) पर्यंत मिळेल. आम्ही ३५६ जणांचे लसीकरण करून घेतले तसेच लोकांनी प्रति डोससाठी १२०० रुपये (अधिक जीएसटी) दिले. परंतु पैशापेक्षा आता आम्हाला काय देण्यात आले याची चिंता आहे. हे अस्सल कोविशील्ड आहे की सलाईन वॉटर?" ते पुढे म्हणाले, "आम्हाला सांगितले गेले की आम्हाला [मुंबईत] कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटलकडून लसीकरण प्रमाणपत्र मिळू शकेल."

खरंतर अनेक निर्माते आणि निर्मीतोसंस्था यांनी आपापले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी लसीकरण मोहीम पार पडल्या आहेत. डुप्लिकेट वॅक्सीन देण्याचा प्रकार घृणास्पद असून दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असे मत मनोरंजनसृष्टीतून व्यक्त केले जातेय.

हेही वाचा - नवीन पर्वात आमची जबाबदारी सांभाळून खूप धमाल करू - आर्या आंबेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.