मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिचे अलिकडेच मुंबईचा व्यावसायिक वैभव रेखीसोबत विवाह झाला होता. काही दिवसापूर्वी मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे जोडपे पोहोचले होते. गुरुवारी दीयाने सर्वांनाच चकित करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली आहे. तिने आपल्या गरोदरपणाची घोषणा यातून केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आपल्या गर्भात स्वप्नांचा गोळा वाढत असल्यामुळे धन्य झाल्याचे दीया मिर्झाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ही बातमी कळताच बॉलिवूडमधील अनेकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिला अभिनंदनाचा संदेश पाठवणाऱ्यांमध्ये करिश्मा कपूर, जॅकलिन फर्नांडिज, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, आदिती राव हैदरी, विक्रांत मेसी यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी दीया आणि वैभव रेखी यांना आई वडिल होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दीया मिर्झाने फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई येथील व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केले. अलिकडेच ती तिच्या पती आणि सावत्र मुलीसमवेत मालदीव येथे सुट्टीवर गेली होती. दीयाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिचे लग्न साहिल संघाशी झाले होते, ती तिची बिझिनेस पार्टनर देखील होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - एव्हरग्रीन रेखा ने नेहा कक्कर ची भरली ‘ओटी’!