ETV Bharat / sitara

कोरोना व्हायरस : प्रकाश राजने दाखवले मोठे मन, स्टाफला अॅडव्हान्स पगारासह दिली सुट्टी - कोरोना व्हायरस : प्रकाश राजने दाखवले मोठे मन, स्टाफला अॅडव्हान्स पगारासह दिली सुट्टी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अभिनेता प्रकाश राज यांनी आपल्या सर्व स्टाफला अॅडव्हान्समध्ये महिन्याचा पगार दिला आहे. तसेच सर्वांना सुट्टी देऊन घरी राहण्याचा सल्लाही दिलाय.

Prakash Raj
प्रकाश राज
author img

By

Published : Mar 24, 2020, 5:23 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे कामकाज ठप्प झाले आहे. सर्वजण सोशल डिस्टन्सिंग आणि आयसोलेशनमध्ये गुंतले आहेत. अशावेळी बॉलिवूडचे प्रसिध्द खलनायक त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी हिरो बनले आहेत. कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी प्रकाश राज यांनी आपल्या संपूर्ण स्टाफला अॅडव्हान्समध्ये पगार देऊन सुट्टीवर पाठवले आहे.

प्रकाश राज यांनी आपल्या प्रॉडक्शन हाऊससह, सिनेमा, घरचे कर्मचारी आणि फार्मवर काम करणारे कामगार यांना सुट्टी दिली आहे.

प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ''#जनता कर्फ्यू... माझ्याकडे जमा असलेल्या फंडमधून माझे फार्म्स, घर, फिल्म प्रॉडक्शन, संस्था आणि खासगी स्टाफशी संबंधित सर्वांना मे महिन्यापर्यंतचा अॅडव्हान्स पगार दिला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या कारणामुळे माझ्या तीन चित्रपटाशी संबंधित डेली व्हेजीस कर्मचाऱ्यांना अर्धा पगार दिला आहे. पुढेही माझ्याकडून जे शक्य आहे ते सर्व त्यांच्यासाठी काहीना काहीतरी करीत राहीन.''

प्रकाश राज यांनी गरजवंतांना मदत करम्याचे आवाहनही केले आहे. पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, ''ज्या लोकांची गरज आहे अशा सर्वांची शक्य ती मदत करा, असे माझे आवाहन आहे. आयुष्यात परत करण्याची वेळ आलीय, एक दुसऱ्यासाठी मदत करण्याची वेळ आली आहे.''

प्रकाश राज यांना सोशल मीडियावरुन खूप शुभेच्छा मिळत आहेत. प्रकाश राज यांच्या अगोदर मनिष पॉल यानेही आपल्या स्टाफला अॅडव्हान्स पगार देऊन सुट्टीवर पाठवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.