मुंबई - 'बाहुबली' सिनेमानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. केवळ दाक्षिणात्य राज्यच नव्हे, तर संपूर्ण देशभरात प्रभासचे अनेक चाहते आहेत. अशात आता एका फॅनने प्रभासला भेटण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणातील जनगाम येथील एक तरुण सेलफोन टॉवरच्या टॉपवर चढला आणि आत्महत्या करत असल्याची धमकी देऊ लागला. प्रभासला भेटण्यासाठी तो हट्ट करत होता. इतकंच नाही, तर तो प्रभासला त्याच ठिकाणी बोलवून घेण्यासाठीही हट्ट करत होता.
शेवटी खूप समजवल्यानंतर आणि प्रभाससोबत भेट घालून देऊ, असं उपस्थितांनी सांगितल्यानंतर हा डायहार्ट फॅन खाली उतरला. प्रभासच्या बाबतीत अनेकदा या गोष्टी घडत असतात. काही दिवसांपूर्वीच त्याचं कट आऊट लावताना विजेच्या तारेचा शॉक लागून आंध्र प्रदेशात एकाचा मृत्यू झाला होता.