ETV Bharat / sitara

प्रभासच्या 'डायहार्ट फॅन'चा 'साहो'साठी मृत्यू - fixing Saaho banner

प्रभासच्या 'साहो'चे पोस्टर लावणाऱ्या तरुण फॅनचा इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला आहे. थिएटरवर बॅनर लावताना ही घटना तेलंगणातील मेहबुबनगरमध्ये घडली.

अभिनेता प्रभास
author img

By

Published : Aug 29, 2019, 5:20 PM IST

हैदराबाद - अभिनेता प्रभासचा 'साहो' हा चित्रपट ३० ऑगस्टला रिलीज होतोय. तेलंगणा आणि आंध्रमध्ये प्रभासचे डायहार्ट फॅन आहेत. दक्षिणेतील राज्यात जेव्हा चित्रपट रिलीज होतो, तेव्हा अभिनेत्यांचे चाहते थिएटर्स सजवतात, उंच कटआऊट लावतात, बॅनरबाजी होते. साहोचे पोस्टर लावण्याचे काम मेहबूबनगर येथील तिरुमाला थिएटरमध्ये सुरू होते. त्यावेळी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

थिएटरवर पोस्टर लावण्याचे काम सुरू होते. प्रभासचा एक फॅन यासाठी थिएटरच्या भिंतीवर चढला असताना त्याचा संपर्क इलेक्ट्रीक तारांशी आला. त्याला जोरदार झटका बसला आणि तो वरुन खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला झाला आहे.

घटनेनंतर तेलंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा तपशील अद्याप प्रभासपर्यंत पोहोचलेला नाही.

साहो चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही तास उरले आहेत. या चित्रपटात प्रभास आणि श्रध्दा कपूर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करीत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.